धर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 16:32

उत्तर प्रदेशमध्ये प्रेमासमोर मोठ्या विरोधाचा अखेर पराभव झालाय. धर्माचं बंधन तोडत एका प्रेमीयुगुलाचा निकाह चक्क मंदिरात झाला. या विवाहाला काजी साहेबांसोबत दोन्ही तरुणांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

सिमेंटच्या जंगलात जिवंत झाडांवर विषप्रयोग!

Last Updated: Friday, April 11, 2014, 10:29

मुंबईतील मोक्याच्या आणि धंद्यासाठी सोयीच्या जागांवरील झाडांचा अडसर दूर करण्यासाठी दिवसाढवळ्या या वृक्षांवर विषप्रयोग करण्याचे षड्यंत्र राबवलं जातंय.

अनुष्काला भेटण्यासाठी विराट जोधपूरमध्ये, मध्यरात्रीपर्यंत एकत्र!

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 13:53

ढाकामध्ये टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेच्या हातून झालेल्या पराभवानंतर लगेच दोन दिवसांनीच म्हणजे मंगळवारी टीम इंडियाचा उप-कर्णधार आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ विराट कोहली थेट पोहोचला जोधपूरमध्ये... अभिनेत्री अनुष्का शर्माला भेटण्यासाठी.

फोटोंचं मोझॅक करून साकारला सचिन

Last Updated: Thursday, March 27, 2014, 14:18

सचिनच्या जगभरातल्या फॅन्सनी पाठवलेले तब्बल १७ हजार फोटो आणि त्या फोटोंचं मोझॅक करून साकारला पुन्हा एकदा सचिनच. कोणत्याही क्रिकेटपटूच्या सर्वात मोठ्या डिजिटल मोझॅकचं अनावरण सचिनच्या हस्ते झालं.

शिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 21:17

निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाण्यातले स्कायवॉक प्रेमी युगुलांचे अड्डे

Last Updated: Sunday, February 23, 2014, 10:16

ठाण्याची शान समजला जाणारा सॅटीस प्रोजेक्ट, त्याच्या आजूबाजूचे स्कायवॉक सध्या प्रेमी युगुलांचे अड्डे बनलेत. त्यामुळे ठाणेकर वैतागलेत.

हॉरर किलिंग... प्रेमी युगुलाची कुटुंबीयांकडूनच क्रूर हत्या!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 10:05

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

दिल्ली मेट्रोच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमींसाठी भाड्यानं

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:30

दिल्लीतल्या मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजचा एमएमएस बनवून विकण्याचा प्रकार नुकताच घडला असतांना, दिल्ली मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. झी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो रेल्वेच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमी युगुलांना सर्रास भाड्यानं दिले जातायेत. त्याद्वारं मेट्रोतील कर्मचारी पैसा कमवतायेत.

अजब...एकाच स्त्रीबरोबर दोन प्रियकरांचे लग्न

Last Updated: Friday, August 30, 2013, 16:17

एक थक्क करणारी बातमी. दोन प्रियकर आणि एक प्रेयसी. दोघांमधून एकाची निवड करण्यास प्रेयसीचा नकार. त्यामुळे काय करायचे, यावर खल सुरू झाला. तोडगा काही निघेना. त्याचवेळी प्रेयशी ही विधवा असून तिला मूलही आहे. असे असताना दोघांनाही तिच्याशी लग्न करायचे होते.

जातीचा अडसर, प्रेमी युगुलांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 22:19

लग्न करण्यासाठी जातीचा अडसर आल्यानं जळगावात प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली

व्हिडिओ गेमच्या नादापायी सहा वर्ष कॅफेमध्येच

Last Updated: Thursday, April 4, 2013, 15:32

व्हिडिओ गेम प्रेमी तुम्हाला साऱ्या जगभर दिसतील परंतु या सम हा. चीनमधल्या एका युवकाने स्वतःला सहा वर्ष सायबर कॅफेमध्ये बंदिस्त करून घेतल आहे. कारण त्याला सतत व्हिडिओ खेळता यावं म्हणून.

`परदेशी पक्ष्यांच्या आयातीवर बंदी मागे घ्यावी`

Last Updated: Thursday, April 4, 2013, 14:45

पुण्यातल्या इस्माईल दाम्पत्याच्या घरात जणू काही कायमच पक्षी महोत्सव भरलेला दिसतो. साहिल इस्माईल यांना पक्षी जोपासण्याचा अनोखा छंद जडलाय. आजवर त्यांनी ४०० हून अधिक विविध जातीचे पक्षी जोपासलेत.

लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाची आत्महत्या...

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 14:01

पिंपरी-चिंचवडमधल्या भोसरी भागात प्रेमीयुगुलानं आत्महत्या केलीये. विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

`किस` करणं, ठरलं `जीवघेणं`

Last Updated: Friday, March 1, 2013, 16:49

आपल्याला आवडणाऱ्या मुलीचा किस घेणं बिजनौरच्या एका आशिकाला चांगलंच महागात पडलं. यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

शिवसेनेनेही साजरा केला व्हॅलेनटाईन डे...

Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:22

व्हॅलेनटाइन डे जेष्ठ नागरिकांबरोबर साजरा करताना गुलाबाचं फूल आणि तुळशीचं रोपट शिवसैनिकांनी सिनियर सिटीजन्सना दिले.

‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येलाच प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Last Updated: Thursday, February 14, 2013, 10:41

‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येलाच औरंगाबादमधील एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रेमीयुगुल नात्याने मावसभाऊ-बहीण होते.

प्रेमी युगुलांचे बॉडीगार्ड होणार मुंबई पोलीस....

Last Updated: Friday, January 25, 2013, 12:40

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर एकांतात बसणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे.

आता कुठे जायचं... प्रेमी युगुलांची झाली पंचाईत!

Last Updated: Thursday, January 24, 2013, 16:52

मुंबईतल्या प्रेमीयुगलांना एकांतात बसणं महागात पडणार आहे. एकातांत बसणाऱ्या प्रेमीयुगलांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस ठाण्यांना देण्यात आलेत.

विकास आराखड्यावर पर्यावरणप्रेमी नाराज

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 18:10

पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना महापालिका सदस्यांनी त्यातली तब्बल ५२ आरक्षणं बदलली आहेत. त्याचा परिणाम शहराच्या नागरी सुविधांवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय शहरातल्या टेकड्यांवर ४ टक्के बांधकामांना परवानगी देण्यात आल्यामुळे पर्यावरणप्रेमी संतापले आहेत.

कोल्हापूरचा शालिनी पॅलेस जप्त; शाहूप्रेमी अस्वस्थ

Last Updated: Friday, December 14, 2012, 18:01

राजर्षी महाराजांची आठवण आणि कोल्हापूरची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शालिनी पॅलेस’वर सारस्वत बँकेनं गुरुवारी रात्री उशीरा जप्तीची कारवाई केलीय. त्यामुळे कोल्हापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

प्रेमी युगुलाला मारून टाकण्यासाठी लावली ट्रेनला आग

Last Updated: Friday, October 19, 2012, 12:24

सोलापूर-गुलबर्गा या पॅसेंजरला लागलेली आग ही काही तांत्रिक कारणामुळे लागली नव्हती तर ती लावण्यात आली होती.

‘त्या’ साहसवीरांचं धाडस दृश्यरुपात...

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 07:54

पुण्याच्या गिरी प्रेमी संस्थेच्या बारा वीरांनी १९ मे २०१२ ला एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणेकरांचाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा उर अभिमानानं भरून आला. पण ही मोहीम यशस्वी करतानाचा थरार प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणार आहे एका डॉक्युमेंटरीच्या रुपानं...

प्रेमी जोडप्याला निवस्त्र करून मारहाण

Last Updated: Monday, July 23, 2012, 23:29

प्रेम करणं हे पाप आहे का? असाच प्रश्न आता प्रेमी युगुलाला पडला असणार? कारण एका प्रेमी जोडप्याला झोडपून काढत चार तास झाडाला बांधून ठेवलं. हे गावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या दोघांचे केस कापून टाकले व नंतर विवस्त्र करुन त्यांना झाडाला बांधले.

'मनसे'च्या प्रेमी युगुलाला राज ठाकरेंचा आशीर्वाद

Last Updated: Monday, June 25, 2012, 21:17

पिंपरी चिंचवड या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच ढोल ताश्याच्या गजरात मोठ स्वागत करण्यात आलं.

‘एव्हरेस्ट’वीरांचं उत्साहात स्वागत

Last Updated: Sunday, June 3, 2012, 15:05

पुण्याच्या आणि पिंपरी-चिंचवडच्या काही उमद्या तरुणांनी नुकताच एव्हरेस्ट सर करून एव्हरेस्टवर मराठमोळा झेंडा रोवला. यानंतर आज गिरीप्रेमी संस्थेचे हे तरुण पुण्यात दाखल झालेत. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.