आमदाराच्या पत्नीची हत्या, BSP MLA`s wife stabbed to death at Delhi home

आमदाराच्या पत्नीची हत्या

आमदाराच्या पत्नीची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे आमदार हाजी अलीम यांच्या पत्नीची आज सकाळी दिल्लीत त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. चाकूसारख्या धारदार शस्त्राने ही हत्या केली गेल्याची शंका व्यक्त होत आहे.

हाजी अलीम यांच्या पत्नीचे नाव रेहाना असून, त्या पूर्व दिल्लीतील नवीन जाफ्राबाद येथे राहत होत्या. हाजी अलीम हे सध्या हज यात्रेला गेले आहेत. मंगळवारी रात्री त्यांची ओळखीच्या व्यक्तीकडूनच हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आली आहे.

ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा खोलीतील सामान इतस्ततः विखुरलेले होते. हाजी अलीम हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मतदारसंघाचे आमदार आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 20:23


comments powered by Disqus