Last Updated: Saturday, April 6, 2013, 19:12
www.24taas.com, पटनाशिळफाटा दुर्घटना प्रकरणी दोन्ही बिल्डर्स जमील कुरेशी आणि सलीम शेख यांना अटक करण्यात आलीये. मुंब्रा पोलिसांनी केलेल्या कारवाईत जमील कुरेशी याला उत्तरप्रदेशातल्या त्याच्या मुळ गावातून ताब्यात घेण्यात आलंय. तर सलीम शेख याला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलंय. या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय
ठाण्यातील शिळफाटा रोडवरच्या कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम तब्बल 42 तासांनंतर संपलं. 72 निष्पापांचे जीव घेणा-या या इमारती शेजारच्याही अन्य दोन इमारती पाडण्यास सुरुवात झालीये या दुर्घटनेला जबाबदार असलेला बिल्डर जमील कुरेशी याला गुन्हा दाखल झाल्यावर 44 तासानंतर उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगरमधून अटक झाली आहे.
तर दुसरा बिल्डर सलीम शेख यालाही पोलिसांनी गजाआड केलंय. यापुढं अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होतेय.
First Published: Saturday, April 6, 2013, 19:12