नवऱ्याला कॉटला बांधून महिलेवर अत्याचार, Built on violence against women cottle husband

नवऱ्याला कॉटला बांधून महिलेवर अत्याचार

नवऱ्याला कॉटला बांधून महिलेवर अत्याचार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

हरियाणा राज्यातील रेवाडीपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हा प्रकार ऐकल्यावर अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. दहा जणांच्या टोळीनं रेवाडी शहराच्या बाहेर राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

या टोळीनं पीडित महिलेच्या नवऱ्याला बंदूकीचा धाख दाखवून कॉटला बांधून ठेवलं आणि महिलेवर अत्याचार केले. दहा जणांच्या टोळीनं महिलेच्या घरात घुसून पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसंच घरातील सात हजार रुपये आणि घरातील काही मौल्यवान वस्तू घेऊन प्रसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवाडी पासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या बलियार खुर्द या गावामध्ये दहा लोकांच्या टोळीनं शुक्रवारी रात्री पीडित महिलेच्या नवऱ्याला बंदूकीच्या धाकानं घरातील कॉटला बांधलं आणि नंतर पीडित महिलेवर तिच्याच घरात सामूहिक बलात्कार केला.

या दहा आरोपींनी जातांना सात हजार रुपये आणि घरातील काही मौल्यवान वस्तूंबरोबर शेतातील ट्रॅक्टर, ट्रॉली घेऊन ते प्रसार झाले. त्यामुळं रेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार आणि दरोड्याच्या कलमेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 17:09


comments powered by Disqus