सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली, Campa Cola Compound neglected petition

सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे रहिवाशांना 31 मे पर्यंत राहण्याचा दिलासा मिळाला आहे. याचिका फेटाळण्यात आल्याने मुंबई महापालिकेचा कारवाईचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

अनधिकृत घरांविषयी रहिवाशांनी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी झाली. यावेळी ही याचिका फेटाळली. याप्रकरणी न्यायालयीन सुट्टी संपल्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. ३१ मे पर्यंत रहिवाशांना रहाण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

दरम्यान, कॅम्पाकोला या संकुलात राहणार्‍या नागरिकांना ३१ मे पूर्वी घरे खाली करावी लागणार आहेत. कॅम्पाकोलातील अनधिकृत घरांविषयीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवासी आणि बृहन्मुंबई महापालिकेला यापूर्वी चार आठवड्यांची मुदत दिली होती. त्यापूर्वी न्यायालयाने ३१ मे २०१४ पर्यंत कॅम्पाकोला रहिवाशांना घरे रिकाम्या करण्याची नोटीस दिली आहे.

रहिवासी आणि महापालिकेला यावर तोडगा काढता आला नाही तर रहिवाशांना आपली घरे रिकामी करावीच लागतील, असे न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केले होते. मुदत आणखी वाढवून मिळावी, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावल्याने कॅम्पाकोलातील रहिवाशी हवालदिल झाले आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 13:18


comments powered by Disqus