Last Updated: Thursday, June 5, 2014, 22:52
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीकेंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताच्या CBI चौकशीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असं नितीन गडकरींनी म्हटलंय. काल आपण मोदी आणि मुंडेंच्या कुटुंबियांशी चर्चा केली.
सत्य बाहेर येण्यासाठी पंतप्रधान योग्य पावलं उचलतील, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला... लोकांच्या मनात काही शंका असेल, तर त्याचं निरसन व्हायलाच हवं, असंही ते म्हणाले.
देशात दररोज ३७७ बळी जातायत, हे सुद्धा वास्तव आहे. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर ही गोष्ट आणखी प्रकर्षानं समोर आलीय. त्यामुळेच वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीये. 3 पेक्षा जास्त वेळा नियम मोडल्यास लायसन्स रद्द करण्याची तरतूद केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केलीये.
तसंच दुसरीकडे केंद्रीय आयोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही सिटबेल्टची सक्ती करण्याचा मुद्दा लावून धरलाय. सिटबेल्ट लावले नसल्यास पेट्रोल-डिझेल देऊ नये, अशी सूचनाच त्यांनी केलीये.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 5, 2014, 22:50