Last Updated: Wednesday, November 6, 2013, 15:06
www.24taas.com, झी मीडिया, जोधपूर अल्पवयीन मुलींवरील बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर आज जोधपूरच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीसांनी आरासामबापूच्या विरोधात ठोस पुरवे गोळा केलेत. आसाराम बापूंवर आरोप सिद्ध झाल्यास त्यांना १० वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. आज आसाराम बापूंच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गेल्या दोन महिन्यांपासून आसाराम बापू जोधपूरच्या सेंट्रल तुरुंगात बंद आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 6, 2013, 15:06