Last Updated: Sunday, November 17, 2013, 15:45
www.24taas.com, झी मीडिया, बस्तर/छत्तीसगढछत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते ७२ जागांसाठी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाकडं. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलंय.
छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपायला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलाय.
काँग्रेसच्या प्रचाराची संपूर्ण मदार या टप्प्यातही माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अजित जोगी यांच्यावरच राहिली.
रमणसिंह यांच्या शासनाला वैतागलेली जनता पुन्हा एकदा काँग्रेसलाच सत्तेवर आणेल, असं जोगी यांनी म्हटलंय. सत्ता आल्यास जोगी हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी शक्यताही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली.
तर छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. नरेंद्र मोदींच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळं पहिल्या टप्प्यात मतदान जास्त झाल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळं दुसऱ्या टप्प्यातही भाजपला मोदींचाच आधार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, November 17, 2013, 15:45