गुरूकुलमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांवर संचालकाकडून लैंगिक अत्याचार

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 11:46

छत्तीसगढच्या रायपूरमध्ये एका गुरूकुलमध्ये आश्रम संचालकावर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलांच्या पालकांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तपास NIA करणार - शिंदे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 16:59

छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.

छत्तीसगडमध्येही भाजपची विजयाची हॅट्ट्रीक!

Last Updated: Monday, December 9, 2013, 08:26

अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.

पराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा

Last Updated: Sunday, December 8, 2013, 19:12

मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी दिला आहे.

छत्तीसगढ: भाजप-काँग्रेसमध्ये घमासान, रमण सिंह यांची हॅट्रटीक?

Last Updated: Sunday, December 8, 2013, 08:58

आता पाहुयात छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये घमासान रंगलंय. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ५० जागांवर विजय मिळवत पुन्हा सरकार स्थापन केलं. काँग्रेसला केवळ ३८ जागा मिळवता आल्या. तर बसपाच्या खात्यात २ जागा गेल्या.

अजित जोगी की नरेंद्र मोदी?

Last Updated: Sunday, November 17, 2013, 15:45

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते ७२ जागांसाठी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाकडं. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलंय.

नक्षलवादी कारवायांचा मतदानावर परिणाम होईल?

Last Updated: Monday, November 11, 2013, 08:59

नक्षलवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर जरी मिळत असलं, तरी नक्षलवादी कारवायांचा छत्तीसगढच्या मतदानावर परिणाम होईल का?

नक्षलवाद्यांचा मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला

Last Updated: Monday, November 11, 2013, 08:37

छत्तीसगढमध्ये १८ जागांसाठी मतदान होतंय. त्यापैकी १२ जागांच्या मतदानावर नक्षलवाद्यांचं सावट आहे.

भ्रष्टाचारात भाजप वर्ल्ड चॅम्पियन - राहुल गांधी

Last Updated: Saturday, November 9, 2013, 00:03

काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधींनी छत्तीसगढ सरकारवर कडाडून टीका केलीय. छत्तीसगढ सरकार भ्रष्टाचाराचे वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.

सोनेरी स्वप्न: डौडिया खेडाचा संबंध छत्तीसगढ सोबत!

Last Updated: Thursday, October 24, 2013, 10:26

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडा सध्या खूप चर्चेत आहे. राजा राव रामबक्श सिंग यांच्या किल्ल्यात १००० टन सोनं शोधण्यासाठी मागील ६ दिवसांपासून उत्खनन सुरू आहे. आता एक नवा शोध लागलाय की, डौडिया खेडा इथल्या राजवंशाचा संबंध छत्तीसगढ सोबत आहे.

रंगलं युद्ध मगर आणि महिलांमधलं!

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 11:25

मगरी सोबतच्या युद्धात विजय महिलांचा झाला. बातमी आहे छत्तीसगढची राजधानी रायपूर परिसरातली. रायपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेमेतरा इथल्या बाबा मोहतरा इथं सोमवारी महिला आणि मगरीमध्ये युद्ध रंगलं. ११० वर्षीय मगरीच्या तोंडचा घास बनण्यापासून तीन महिलांनी एकीला वाचवलं आणि हे युद्ध जिंकलं.

करीनामुळे दणाणले छत्तीसगढ सरकारचे धाबे

Last Updated: Thursday, November 1, 2012, 14:12

करीना कपूर ही पतौडी संस्थानाची बेगम जरी झाल्यावर तिचे नखरे आणखीनच वाढले आहेत. तिच्या नखऱ्यांनी छत्तीसगढ सरकारही हैराण झालं आहे. छत्तीसगढ राज्याच्या राज्योत्सवात करीना कपूरचा डान्स सादर होणार होता. मात्र करीनाने मानधन मिळाल्याशिवाय कार्यक्रमाला न येण्याची धमकी दिल्यामुळे छत्तीसगढ सरकारचे धाबे दणाणले

"मुलाने केलं पाप, तरी गुन्हेगार ठरणार बाप!"

Last Updated: Monday, July 16, 2012, 16:05

छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंग यांनी एक विचित्र वक्तव्य केलं आहे. रमण सिंग यांचं म्हणणं आहे की मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या वडिलांना देण्यात यावी. रणण सिंग यांच्या मते मुलाच्या गुन्ह्याचे खरे अपराधी वडील असतात.

जोगींचा भाजपावर हल्लाबोल

Last Updated: Sunday, November 13, 2011, 14:56

छत्तीसगढमधील २०,००० मुलींना गेल्या आठ वर्षात देहव्यापारासाठी दिल्ली, मुंबई, बंगलोर आणि चेन्नईत विकण्यात आल्याचा सनसनाटी दावा काँग्रेसचे नेते अजीत जोगी यांनी केला.