मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय, Chief Minister Prithviraj Chavan No change

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय
www.24taas.com,वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय मिळाल्याचं वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकाच्या गाठीभेटी घेतल्या.

मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांसह राष्ट्रपतींचीही भेट घेतली. सोनियांना भेटल्यानंतर ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही भेटले. मुख्यमंत्री बदलाचा अंतिम निर्णय़ सोनिया गांधीच घेणार असून त्या सर्व शक्यता पडताळून बघत असल्याचं चव्हाणांनी सोनियांची भेट घेण्यापूर्वी सूत्रांनी सांगितलं.

मात्र तुर्तास नेतृत्वबदल करायचा नाही, अशी पक्षश्रेष्ठींची मानसिकता झाल्याचं समजतंय. 28 तारखेला पुन्हा मुख्यमंत्र्यांकडून खुलासा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं समजतंय. मुख्यमंत्र्यांचा यावेळचा दिल्ली दौरा चांगलाच झंझावती ठरलाय. गेल्या २४ तासांत त्यांनी दिल्लीत अनेकांच्या भेटी घेतल्यात.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 21, 2014, 20:23


comments powered by Disqus