‘सेक्स अॅन्ड स्मोक’ पार्टीत झिंगली `चिल्लर पार्टी`, chiller party attended sex and smoke party at gurgaon

‘सेक्स अॅन्ड स्मोक’ पार्टीत झिंगली `चिल्लर पार्टी`

‘सेक्स अॅन्ड स्मोक’ पार्टीत झिंगली `चिल्लर पार्टी`
www.24taas.com, झी मीडिया, गुडगाव

राजधानी दिल्ली नजिकच्या गुडगावमधील एका हुक्का पार्लरवर रविवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १०० हून जास्त अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आलंय. हे सर्व जण दारूच्या नशेत हुक्का फुकत असताना आढळले.

पोलिसांनी या हुक्का पार्लरच्या मालकाला अटक केलीय. पकडले गेलेले सर्व मुलं-मुली १३ ते १७ या वयोगटातील आहेत. बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत त्यांना पकडलं गेलं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मिळालेल्या सुचनेनुसार ‘बज्ज इन बार’मध्ये ‘सेक्स अॅन्ड स्मोक’ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. एका विद्यार्थ्यांनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही पार्टी आयोजित केली होती. फेसबूकमार्फत सगळ्यांना आमंत्रण दिलं गेलं होतं. या पार्टीत जवळजवळ १०० अल्पवयीन मुला-मुलींनी हजेरी लावली होती. सगळ्यांना तंबाखू, दारू आणि कबाब दिलं गेलं होतं.

सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी एक संयुक्त टीम तयार केली आणि पूर्ण मॉललाच घेराव घातला. यावेळी घातलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी इथं आढळलेल्या १८ वर्षांहूनही कमी असलेल्या ‘चिल्लर पार्टी’ला ताब्यात घेतलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 15, 2013, 11:28


comments powered by Disqus