पुन्हा नशेत `चिल्लर पार्टी` पोलिसांच्या ताब्यात!, chiller party in gurgaon

पुन्हा नशेत `चिल्लर पार्टी` पोलिसांच्या ताब्यात!

पुन्हा नशेत `चिल्लर पार्टी` पोलिसांच्या ताब्यात!
www.24taas.com, झी मीडिया, गुडगाव

गुडगावमध्ये जिल्हा प्रशासनाच्या विशेष टीमनं टाकलेल्या धाडीत एका बारमधून नऊ अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यत घेण्यात आलंय. हे सगळे अल्पवयीन मुल-मुली दारुच्या नशेत धुंद होते.

विपुल अगोरा मॉलमधल्या ‘क्लब-18’ या बारमध्ये पोलिसांनी ही धाड टाकली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ६ मुलं आणि ३ मुलींचा समावेश आहेत. या सगळ्यांची वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जवळजवळ २५ जण इथं उपस्थित होते. परंतु, बारचा एकही कर्मचारी मात्र यावेळी इथं सापडला नाही, त्यामुळे स्टॉक रजिस्टरची चौकशी करता आली नाही, असं कारण पोलिसांनी दिलं.

क्लब १८ सोबतच पोलिसांनी उत्तर भागातील मॉलमधल्या रायनो क्लब, सेवन्थ डिग्री मायक्रो ब्रेव्हरिज, बज्ज इन आणि मीडिया कॅफे इथंही धाडी टाकल्या. १४ जुलै रोजी एमजी रोड स्थित ‘बज्ज इन’ बारमध्ये नशेत झिंगलेल्या जवळजवळ १०० मुला-मुलींना चिल्लर पार्टीतून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ही ‘सेक्स अॅन्ड स्मोक पार्टी’ उजेडात आल्यानंतर प्रशासनानं एका विशेष टीम बनवलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 14:40


comments powered by Disqus