19 वर्षांच्या मुलीची उंची 78 सेंमी, वजन अवघं 10 किलो

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 20:09

वाचायला थोडं विचित्र वाटेल, पण बंगाल राज्यातील मीरापूर येथील कस्बे गावातील अजिफा शेख हीचं वय 19 असून तिची उंची फक्त 78 सेंटीमीटर तर वजन 10 किलोच आहे. ती आपल्या आईच्या खुशीत असते, तिला पाहिले तर ती दोन वर्षांची मुलगी वाटते. गल्फ न्यूजच्या बातमीनुसार, ती शाळेत ही जाते, लहान-लहान मुलांसोबत देखील खेळते.

या खेळाडूसाठी 60% भारतीय मुलींना होतेय `धकधक`

Last Updated: Monday, June 16, 2014, 13:01

सध्या सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप जगभरात गाजतोय. आपल्या आवडत्या खेळांडूना बघायला त्याचे चाहते उत्सुक असतात. त्यापैकी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीच्या प्रेमात चक्क 60% भारतीय मुलीं पडल्यात...मेस्सी हा भारतीय मुलींचा आवडता फुटबॉलर असल्याचे समजतेय.

गुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी

Last Updated: Monday, June 9, 2014, 14:32

कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

मुजरा पार्टीवर छापा, 12 मुली, 14 पुरूष अटकेत

Last Updated: Sunday, June 8, 2014, 22:16

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कलोते गावामध्ये मुजरा पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून अश्लील वर्तवणूक करणाऱ्या १२ मुली आणि १४ पुरुषांना अटक केली आहे.

मनोरमा सदन महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार

Last Updated: Saturday, June 7, 2014, 10:20

मनमाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना, पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली अहे.

मुंबईत महिला अत्याचारांत वाढ

Last Updated: Friday, June 6, 2014, 23:38

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचं समोर आलंय.. अजूनही राज्यात महिला असुरक्षितच आहेत हे सिद्ध करणा-या दोन घटना गेल्या तीन दिवसांत घडल्यात. सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत महिला अत्याचाराचा घृणास्पद प्रकार उघड झाला.

मुंबईत पुन्हा धावत्या लोकलमध्ये तरुणीवर हल्ला

Last Updated: Friday, June 6, 2014, 13:24

लोकल ट्रेनमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मीरारोडमध्ये धावत्या लोकलमध्ये आज सकाळी एका तरूणीवर हल्ला करण्यात आला. याआधी नालासोपाऱ्यात महिलेची हत्या करण्यात आली होती.

तीन शाळकरी मुलींचा `व्हेनम` रॉक बँड

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 20:54

नमिता सबनीस, स्वरा कुलकर्णी आणि अर्शिया बांगेरा या तीन शाळकरी मुलींच्या `व्हेनम` या रॉक बँडची जादू २४ मे पुणेकरांना ऐकता येणार आहे.

त्याच्यामुळं ती चढली बोहल्यावर! ढाणकीतील भावूक घटना!

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 10:29

हॉटेलमध्ये साधा नोकर असलेल्या एका तरुणानं आपला प्रामाणिकपणा सिद्ध केलाय. त्यानं चक्क पाच लाख रुपयांचा ऐवज सापडूनही मोह आवरला आणि ज्याचे पैसे त्याला सहिसलामत परत केले. हे पैसे होते एका मुलीच्या लग्नाचे.

दीडशे रुपयांसाठी बापानं दुसऱ्या मुलीलाही विकलं

Last Updated: Sunday, April 27, 2014, 12:12

एकीला विकून पोट भरलं नाही तर दारुड्या बापानं केवळ दीडशे रुपयांसाठी आपल्या पोटच्या एक वर्षाच्या मुलीला विकल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय. मध्य प्रदेशच्यादिट्या जिल्ह्यात हा प्रकार घडला. यापूर्वीही या नराधमानं त्याच्या अन्य एका मुलीला विकलं होतं.

मुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा

Last Updated: Saturday, April 26, 2014, 17:01

वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत.

हेडमास्टरने केला पाच मुलींचा लैंगिक छळ

Last Updated: Friday, March 28, 2014, 21:51

तुमच्या घरातील लहान मुली शाळेत जात असतील, तर ही बातमी वाचून तुम्हांला धक्का बसेल. पंजाबमधील संगरूर येथील मलेरकोटला येथील एका धार्मिक स्थळावर चालणाऱ्या एका शाळेच्या हेडमास्टरविरोधात पाच विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुलींनी जीन्स पॅंट घालू नये यासाठी फतवाच

Last Updated: Thursday, March 27, 2014, 09:59

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पंचायतीचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या पंचायतीने मुलींना जीन्स पॅंट घालण्याबाबत फतवा काढला आहे. मुलींनो जीन्स पॅंट घालू नका, असा फतवा आहे.

कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा बलात्कार

Last Updated: Monday, March 24, 2014, 08:53

कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा एकदा बलात्कार झाल्याची घटना उघड झालीय. मानखुर्दच्या सुधारगृहात ही धक्कादायक बाब समोर आलीय.

अभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ

Last Updated: Saturday, February 22, 2014, 23:33

अभिनेता मोहनीश बहलच्या ठाण्यामधल्या बंगल्यात एक दिवसाचं मृत बाळ सापडलंय. स्विमिंग पूलमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. ठाण्यातल्या मुंब्रा-कळवा रोडवर हा बंगला आहे. या संदर्भात अभिनेता मोहनिश बहल यानं धाव घेतली.

जबरी चुंबन पडले महाग, मुलीने तोडली जीभ

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:00

जबरदस्तीने किस करणाऱ्या मुलाला एखाद्या मुलीने काना खाली लगावली असे तुम्ही ऐकले असेल पण अशा प्रकारे जबरदस्ती करणाऱ्या मुलाची चक्क जीभ चावा घेऊन तोडल्याची घटना तुमच्या ऐकिवात नसेल.... पण असे घडलं मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये

मुलासाठी ३ बहिणींवर आत्याच्या पतीचा बलात्कार

Last Updated: Thursday, January 9, 2014, 17:41

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन बहिणींनी आपल्या आत्याच्या नवऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. पीडित बहिणींनी दिलेल्या तक्रारी नुसार आत्याला एकही मुलगा नव्हता.

माजी `मिस व्हेनेझुएला`ची मुलीसमोर क्रूर हत्या

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 12:39

माजी मिस व्हेनेझुएला मोनिका स्पीयर आणि तिचा ब्रिटन पती थॉमस बेरी यांची त्यांच्याच कारमध्ये क्रूर पद्धतीनं गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. मोनिका आणि थॉमस यांच्या पाच वर्षांच्या मुलीच्या उघड्या डोळ्यांसमोर या दोघांची हत्या झालीय.

ऐका हे खरंय! अर्जेंटीनामध्ये गरोदर पुरुषानं दिला मुलीला जन्म

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 11:49

आपल्याला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण, हे पूर्णपणे खरं आहे... अर्जेंटीनाच्या एन्त्रे रायत परिसरात एका महिलेनं नाही तर पुरुषानं गोंडस अशा मुलीला जन्म दिलाय.

नराधम पित्याने बलात्कारानंतर मुलीशी लग्न लावलं

Last Updated: Sunday, January 5, 2014, 18:30

मुलगी आणि पित्याच्या पवित्र नात्याला काळीमा लावण्याचा प्रकार मेरठमधील लिसाडीत झाला आहे. या नराधम पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर प्रकरण पंचायतीत पोहोचला.

जेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते...

Last Updated: Friday, January 3, 2014, 23:05

सुपरस्टार श्रीदेवीनं नुकतेच काही फोटो ट्विटरवर टाकले आहेत. यात श्रीदेवी आणि बोनी कपूर आपल्या मुलींसोबत सुट्ट्या एंजॉय करतांना दिसतात.

पृथ्वी`राजकन्ये`चा विवाह, साधेपणाचा ‘आदर्श’!

Last Updated: Friday, November 29, 2013, 19:27

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांपुढं नवा `आदर्श` घालून दिलाय. कसलाही थाटमाट किंवा बडेजाव न मिरवता, अत्यंत साधेपणानं त्यांनी आपली लाडकी कन्या अंकिता आणि दिल्लीतील व्यावसायिक प्रखर भंडारी यांचं लग्न लावून दिलं. त्यांचा हा आदर्श भपकेबाज राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

संतांच्या माहेरघरातून दोन मुलींचं अपहरण!

Last Updated: Thursday, November 28, 2013, 00:06

पंढरपूरमधील नवरंगे बालकाश्रमातून नऊ आणि बारा वर्षांच्या दोन मुली गायब असल्याचं उघड झालंय.

मला उंच मुली आवडतात - आमीर खान

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 18:30

आमिर स्वत: उंच नाही मात्र, त्याला उंच मुली खूप आवडतात... आणि हे गुपित आमिरनंच मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलंय.

याला काय म्हणायचं, मुलगी रडली...त्यांनी काढली विकायला

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 08:40

आपलं बाळ कितीही हट्टी असलं किंवा रडलं तरी कोणी ते विकायला काढेल का? नाही ना! परंतु ही वास्तव घटना घडलेय प्रगत अशा अमेरिकेत. अमेरिकेत एक धक्कादायक बाब पुढे आली आहे, बाळ रडलं म्हणून त्याला चक्क विकायला काढलं.

वंशाच्या दिव्यासाठी... आईच्या मदतीनं पत्नी-मुलींची हत्या!

Last Updated: Saturday, November 9, 2013, 11:17

अहमदनगर जिल्ह्यातल्या डोंगरगण इथली ही धक्कादायक घटना... नात्यांवरचा विश्वासच फोल ठरवणारी... आपल्या आईच्या मदतीनं पत्नी व दोन चिमुरडींची हत्या करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केलीय.

प्रेमविवाह केल्याने पित्याने केला मुलीचा बलात्कार-खून

Last Updated: Thursday, November 7, 2013, 07:50

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून पित्याने तिचा खून करून काटा काढलाच शिवाय मित्राच्या मदतीने बलात्कार करून मुलगी-वडील नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना भाईंदरमधील काशीमीरा परिसरात घडली. या धक्कादायक घटनेची चीड व्यक्त करण्यात येत आहे.

आयला...! एक महिला आणि दीडशे हेअरस्टाईल्स?

Last Updated: Sunday, October 20, 2013, 16:43

महिला आयुष्यभरात जवळजवळ दीडशे वेगवेगल्या हेअर स्टाईल आजमावून पाहतात, असं एका संशोधनात आढळून आलंय. यामध्ये केसांचा आकार, रंगछटा व कटचा समावेश आहे.

विवाहित महिलेला लग्नासाठी हवीय मुलगी!

Last Updated: Saturday, September 7, 2013, 17:52

पाकिस्तानात एका विवाहित महिलेला लग्न करायचंय... आणि यावेळेस ती एका मुलीच्या शोधात आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय का? पण, हो हे खरं आहे.

मुंबईत चार वर्षीय मुलीवर बलात्कार

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:04

मुंबईत बलात्काराचं सत्र सुरूच आहे. २८ वर्षीय नराधमानं चार वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. घटना मुंबईतल्या ओशिवारा परिसरातली आहे. ओशिवारा पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.

आईनेच केला पोटच्या मुलीचा शरीरविक्रीसाठी सौदा

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 16:30

पोटच्या मुलीचा शरीरविक्री करता सौदा करणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला तिच्या साथीदारासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दरम्यान, या मुलीची सुटका करण्यात आली आहे. हा प्रकार मुंब्रा परिसरात घडला आहे.

मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुलींचे चाळे

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 11:09

पुण्यातील चिल्लर पार्टीनंतर आता नागपुरात मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुली सहभागी झाल्याचे पुढे आले आहे. या मुली नशेत तर्र झाल्याने पोलीसही चक्रावलेत. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील १८ तरुणी आणि २५ तरुणांना ताब्यात घेतले आहे.

१८ वर्षांखालील मुलीशी संमतीनं शरीरसंबंध गुन्हा नाही!

Last Updated: Monday, August 26, 2013, 08:50

१८ वर्षांखालील मुलीशी संमतीनं शरीरसंबंध हा गुन्हा ठरत नाही, असं दिल्लीतल्या एका स्थानिक कोर्टानं म्हटलंय. त्यामुळं `लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांचं संरक्षण` या कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.

नकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर!

Last Updated: Sunday, August 11, 2013, 08:48

आपल्या सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून त्या मुलीला बदनाम करण्यासाठी तिचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.

मराठीत बोलला म्हणून, विवाहीत मुलीला शिक्षा!

Last Updated: Monday, August 5, 2013, 16:02

मुलीचा पिता मराठीतून बोलला म्हणून त्याच्यावर जात पंचायतीनं कारवाई केलीय. मिरजमधल्या बे़डगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

रेल्वेने केली ‘मुलगी’ झाल्याची उद्घोषणा

Last Updated: Thursday, August 1, 2013, 14:11

मुंबईतील रेल्वेची उद्घोषणा अनेकवेळा चेष्टेचा विषय होतो. रेल्वे प्रशासनाकडून काय घोषणा करण्यात येत आहे तेच नक्की कळत नाही. मात्र, ही उद्घोषणा ऐकून प्रवाशी खूश झाले. लेडीज फर्स्ट क्लास डब्यात मुलगी जन्मली. याची उद्घोषणा रेल्वेने केली आणि वसई स्टेशनवर रेल्वेत मुलीचा जन्म झाल्याची चर्चा सुरू झाली.

बिअर पार्टी उद्धवस्त, १२ मुली ताब्यात

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 21:34

लोणावळ्यातल्या एका बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. पवना डॅमच्या बॅक वॉटर परिसरात बंगल्यात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. छाप्यादरम्यान 12 मुलींसह 35 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज - काँग्रेस

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 12:55

मध्यप्रदेशमधील काँग्रेस नेता मुखिया कांतीलाल भूरिया यांनी राष्ट्रीय स्वंय सेवक संघावर खळबळजनक आरोप केलाय. सुंदर मुलींवर RSSची वाकडी नरज असते. RSSचे कार्यकर्ते सुंदर आदिवासी मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, असा गंभीर आरोप केला आहे.

पुन्हा नशेत `चिल्लर पार्टी` पोलिसांच्या ताब्यात!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 14:43

गुडगावमध्ये जिल्हा प्रशासनाच्या विशेष टीमनं टाकलेल्या धाडीत एका बारमधून नऊ अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यत घेण्यात आलंय. हे सगळे अल्पवयीन मुल-मुली दारुच्या नशेत धुंद होते.

पगारवाढीसाठी बॉसची मुलगी लकी!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 13:08

तुम्हाला तुमच्या पगारात भरघोस वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर तुमच्या बॉसला मुलगीच होईल अशी प्रार्थना आता तुम्ही करायला हरकत नाही. कारण...

स्कर्ट घालून मुले शाळेत...मुली झाल्यात हैराण

Last Updated: Saturday, July 20, 2013, 13:11

मुलं जर मुलींचे कपडे घालून वावरायला लागले तर काय मज्जा येईल ना. होय, तुम्ही बरोबर ऐकलत असचं झालयं ब्रिटनमधील काही शाळांमध्ये. ब्रिटनमधील काही शाळांतील मुलांनी तर अगदी कहरच केला आहे. तिथे विद्यार्थी शाळेमध्ये स्कर्ट घालून जात आहेत. मुलं असं म्हणतायत जर मुली पॅंट तसेच स्कर्ट घालू शकतात तर, मग आम्ही का नाही?

५ मुलींवर बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 23:33

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एका मुलीने तिच्यासह इतर चार बहिणांचा बलात्कार केल्याचा आरोप आपल्याच वडिलांविरोधात लावल्यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

Last Updated: Friday, June 7, 2013, 13:05

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. विभागानुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ८३.४८ इतका लागला आहे.

बलात्काराला घाबरून ‘ती’नं घेतलं जाळून!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 15:56

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं भेदरलेल्या मुलीनं जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. जळगावमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

मुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय

Last Updated: Thursday, May 30, 2013, 08:31

ग्रहांच्या प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर काही तोडगे, विधी सांगितले आहेत.

मुलीला जन्म दिला आणि मृत महिला झाली जिवंत

Last Updated: Monday, May 27, 2013, 12:56

हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मृत ठरविण्यात आलेल्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर मृत झालेली ती महिला जिवंत झाली. ही वास्तवातील घटना असून हा निसर्गाचा चमत्कार अमेरिकेत पाहायला मिळाला.

IPL-6 वर बंदी नाही – सुप्रीम कोर्ट

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 19:03

आयपीएलच्या सहाव्या सीझनच्या प्ले-ऑफच्या मॅचेस होणारच असा निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिला. यामुळे बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.

ती म्हणतेय, मला ‘ति’च्याशीच करायचंय लग्न!

Last Updated: Saturday, May 18, 2013, 16:32

आपल्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडलेल्या युवतीनं मैत्रिणीनं लग्नाला नकार दिल्यानं तिच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतलंय. तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आलंय.

स्पॉट फिक्सिंग- द्रविड, शिल्पा आणि राज कुंद्राची चौकशी?

Last Updated: Friday, May 17, 2013, 18:34

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी काही राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असल्याची वृत्त आहे.

बुकीज पुरवित होते मुली, श्रीसंतला मुलीसोबत अटक

Last Updated: Friday, May 17, 2013, 10:20

आयपीएल फिक्सिंगमध्ये आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. आयपीएलच्या सहाव्या सत्रात मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुलीसोबत पकडला गेला.

फेसबुकवर मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट, रवानगी जेलमध्ये

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 17:16

आता मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे चांगलेच महागात पडू शकते. सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’च्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे धोकादायक ठरणार आहे. एखाद्या तरुणीला तिसऱ्यांदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली तर तुमची रवानगी थेट जेलमध्ये होईल.

वेश्यावस्तीत झाली बाप-लेकीची भेट

Last Updated: Sunday, May 12, 2013, 16:38

पश्चिम बंगालमधून तीन महिन्यांपूर्वी हरवलेली एक मुलगी तिच्या वडिलांना नवी दिल्लीमधल्या वेश्यावस्तीत आढळून आली. ही मुलगी पश्चिम बंगालमधील २४ परगणा या भागात राहाणारी होती.

अंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव!

Last Updated: Friday, May 10, 2013, 18:24

पनवेल तालुक्यातील औला गावात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींचा अंधश्रद्धेतून बळी दिला जाणार होता... पण जागरूक गावकऱ्यांमुळे आणि ‘प्रथम’ या संस्थेच्या हस्तक्षेपामुळे या मुलींचा जीव वाचलाय.

ठाण्यात रूग्ण तरूणी, दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Last Updated: Sunday, May 5, 2013, 11:18

ठाण्यात बलात्काराच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यात तीन बलात्काराच्या घटना उजेडात आल्या आहेत. दिवा येथे उपचार घेण्यास आलेल्या तरूणीवर डॉक्टरांने बलात्कार केला. तर दहिसरमधील काजुपाडा येथील एका मुलीला तिचा मैत्रिणीने फसवून कुंटखाण्याला विकले. दरम्यान तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. दुसऱ्या एका घटनेत १० वर्षांचा मुलीवर शेजाऱ्यांने बलात्कार केला.

महिला अत्याचारांच वाढ, देशात चिंता

Last Updated: Monday, April 22, 2013, 09:22

महिला अत्याचारामुळे नव्याने रान पेटलेय. निषेधाची धग वाढू लागली असतानाच शनिवार आणि रविवारच्या दोन दिवसांत देशात बलात्काराच्या आणखी काही घटना उजेडात आल्या. महाराष्ट्रात घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पाच वर्षांच्या चिमुरडीला ४० तास कोंडून बलात्कार

Last Updated: Friday, April 19, 2013, 14:47

दिल्लीमध्ये आणखी एक बलात्काराची घटना समोर आलीय. गांधीनगर परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून झाल्याची घटना घडलीय.

दहावीच्या मुलीवर नराधम बापानंच केला बलात्कार!

Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:18

नाशिकमध्ये एका नराधम पित्यानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून पीडित मुलगी आपल्या पित्याच्याच अत्याचाराला बळी पडत होती.

मुलीच्या लग्नातील अडचणी, करा हे उपाय

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 09:19

ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर ज्योतिषशास्त्रात काही तोडगे तसेच काही विधी सांगितले आहेत.

बलात्कार-हत्या : आश्रमशाळेच्या संचालकाला फाशी!

Last Updated: Thursday, March 21, 2013, 14:45

पनवेल-कळंबोली येथील आश्रमशाळेतील गतीमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी आज विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावण्यात आलीय.

पेपर कठिण गेल्याने १२वीतील मुलीची आत्महत्या

Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:09

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पेपर कठिण गेल्याने या मुलीने घरी गेल्यानंतर फाशी लावून घेतली.

नाशिकमध्ये विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह

Last Updated: Monday, March 4, 2013, 20:20

नाशिकच्या सातपूर परिसरातील एका विहरीत सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. २३ फेब्रुवारी पासून वैष्णवी ज्ञानेश्वर मोरे ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती.

मामाने विकली, वेश्यांनी वाचवली

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 00:17

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाचा मामाभाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडलीय. मानलेल्या अल्पवयीन भाचीला रेडलाईट एरियात आणून तिला वाईट मार्गाला लावणाऱ्या विजय दिवेला देहविक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं एक आयुष्य उध्वस्त होताना वाचलंय.

तीन मुलींच्या खुनाचा आरोप सासू-सासऱ्यांवर

Last Updated: Thursday, February 21, 2013, 12:43

भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे. या मुलींच्या आईनं आपली सासू, सासरे यांच्यावरच आपल्या मुलींच्या हत्येचा आरोप केला आहे.

अल्पवयीन मुलींची विक्री करणारी टोळी अटकेत

Last Updated: Thursday, February 21, 2013, 09:46

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीबहुल इंदिरानगर भागातून २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात ५ मुली एकापाठोपाठ बेपत्ता झाल्या होत्या.

पिंपरी-चिंचवडमध्ये ८ वर्षीय मुलीवर बलात्कार

Last Updated: Monday, February 18, 2013, 20:15

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा ८ वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आहे. भोसरीमध्ये खंडोबा माळ इथं राहणा-या रामप्रकाश यादव या नराधामानं हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीला कडक शिक्षा करावी अशी मागणी पीडित मुलीचे कुटुंबीय करत आहेत.

बेपत्ता अल्पवयीन मुलींचे सापडले मृतदेह

Last Updated: Sunday, February 17, 2013, 23:22

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातल्या मुरमाडी गावातल्या बेपत्ता अल्पवयीन मुलींचे मृतदेह गावातील एका विहीरीत आढळल्याने गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या तीनही मुली एकाच घरातील असून त्या 3 दिवसांपासून बेपत्ता होत्या.

नांदेडमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 23:43

शाळेतून घरी परतणा-या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. भोकरमध्ये हा सर्व प्रकार घडलाय.

मध्यप्रदेश गृहमंत्र्यांच्या घराजवळ मुलीचा खून

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 17:35

मध्यप्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या निवासस्थानापासून जवळजवळ ६० मीटर दूर काल एका आठ वर्षीय मुलीचं छिन्नविच्छिन्न अवस्थेत शव आढळून आलं.

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 16:03

मुंबईमध्ये एक मौलवी आपल्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या मौलवीला अखेर अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील मुलींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण

Last Updated: Monday, February 4, 2013, 16:06

मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणा-या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लग्न जमत नाही म्हणून मुलीचा घेतला जीव...

Last Updated: Saturday, January 19, 2013, 09:59

मुलीचं लग्न जमत नाही म्हणून जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीचा जीव घेतलाय. पैठण तालुक्यातील बिडकीन गावात ही धक्कादायक घटना घडलीय.

सात वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:09

राज्यासह देशभरात अनेक बलात्काराच्या घटना घडत असताना असाच प्रकार गोव्यामध्ये घडला आहे.

'मुलींनी नाचायचं नाही, मोबाईलवर बोलायचं नाही'

Last Updated: Saturday, January 12, 2013, 21:54

महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायद्याचा फास आवळण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महिलांवर बंधने घालण्याचे फतवेही पंचायतींकडून काढले जात आहेत.

छेडछाडीला कंटाळलेल्या `त्या` मुलीचा अखेर मृत्यू!

Last Updated: Saturday, January 12, 2013, 13:15

उस्मानाबादमध्ये गेल्या आठवड्यात छेडछाडीला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतलेल्या मुलीचा अखेर मृत्यू झालाय. इयत्ता पाचवीत शिकणारी ही मुलगी होती.

मुस्लिम मुलींना मोबाईल बंदी, पंचायतीचा फतवा

Last Updated: Friday, January 11, 2013, 10:32

राजस्थानमधील एका मुस्लिम समाजाच्या पंचायतीने आज (गुरुवार) मुलींच्या संरक्षणासाठी त्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली.

९० वर्षीय म्हाताऱ्याने केले १५ वर्षीय मुलीशी लग्न!

Last Updated: Monday, January 7, 2013, 17:09

साऊदी अरबमधील ९० वर्षांच्या एका आजोबांनी आपल्या नातीच्या वयाच्या म्हणजे १५ वर्षाच्या मुलीशी पैशाच्या जोरावर लग्न करण्याची घटना घडली आहे.

अपनी माता की तो पहचान बनो - बिग बी

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:40

मैं भारत की माँ, बहेनिया, बेटी हूँ, आदर और सत्कार की मैं हकदार हूँ, भारत देश हमारी माता है मेरी छोडो, अपनी माता की तो पहचान बनो!

दिल्ली गँगरेप : दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल

Last Updated: Saturday, December 29, 2012, 19:05

दिल्ली पोलिसांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील सगळ्या म्हणजे सहा आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

प्रणितीची प्रेरणा; बलात्कारीत मुलीचं स्वीकारलं पालकत्व

Last Updated: Friday, December 28, 2012, 19:43

बलात्कारीत मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्या मुलीला स्वावलंबी बनवण्यासाठी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे पुढे आल्यात.

दिल्ली गँगरेपः उपचारासाठी मुलीला पाठविणार परदेशात?

Last Updated: Thursday, December 20, 2012, 13:41

दिल्लीतील सामूहिक बलात्कारामधील पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिला पुढील इलाजासाठी परदेशात पाठविले जाऊ शकते, अशी घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी केली आहे.

दिल्ली गँगरेप : 'ती'च्यात जगण्याची अद्भूत उर्मी, प्रकृती गंभीर

Last Updated: Thursday, December 20, 2012, 13:23

दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडित २३ वर्षांची मुलगी मृत्यूशी झुंज देतेय. पण, तिच्यात जगण्याची एक अद्भूत उर्मी आहे, असं म्हणणं आहे या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं...

मुलीसाठी... १२ लाख खर्चून बांधला कुस्ती आखाडा

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 14:47

मुलींना समाजात दिल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या अनेक कहाण्या आपण ऐकतच असतो... पण, या सगळ्या समाजाला छेद देत कोल्हापुरातील एका पित्यानं आपल्या मुलीसाठी तब्बल १२ लाख रूपये खर्चून कुस्तीचा आखाडा बांधलाय.

बलात्कार आणि बदनामीच्या भीतीनं घेतलं जाळून...

Last Updated: Friday, December 14, 2012, 19:57

अल्पवयीन शाळकरी मुलीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडलीय. आत्येभावानंच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानं बदनामीच्या भीतीनं या मुलीनं हे कृत्य केल्याचं समजतंय.

डोंबिवलीत चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 00:07

डोंबिवलीत चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. शास्त्रीनगर भागातील ही सुन्न करणारी घटना असून बलात्कार करणा-या रिक्षाचालक आरोपीला अटक करण्यात आलीय.

मनसे कार्यकर्त्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Last Updated: Friday, December 7, 2012, 17:16

मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समजते आहे.

पोलिसांवरचा ताण वाढला; पोलीस आयुक्तांच्या मुलीचं लग्न रद्द

Last Updated: Sunday, November 18, 2012, 00:23

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे बंद सुरू झालाय. याचाच परिणाम पोलिसांच्या खाजगी जीवनावरही झालाय. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची मुलगी रिचा हिचं रविवारी होणारं लग्न पुढे ढकललं गेलंय.

म.रे. मध्ये जन्म... रेल्वेच्या उदरात मुलीचा जन्म

Last Updated: Monday, October 29, 2012, 14:07

चालत्या लोकलमध्ये एका महिलेनं गोंडस चिमुकलीला जन्म दिलाय. रविवारी रात्री कांजुरमार्ग आणि घाटकोपर दरम्यान लोकलमध्ये चिमुकलीचा जन्म झालाय.

महिलेने दोन मुलींसह ट्रेनखाली केली आत्महत्या

Last Updated: Saturday, October 27, 2012, 11:02

विरारमध्ये एका महिलेनं तिच्या दोन लहानग्या मुलींसह ट्रेनखाली आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीये. विरारच्या मनवेल पाडा परिसरात राहणा-या या ३५ वर्षीय महिलेचं नाव सारिका भोसले असं आहे.

१३ वर्षांच्या मुलीनं दिला बाळाला जन्म

Last Updated: Thursday, October 25, 2012, 16:51

तिरुअनंतपुरमच्या एसएटी हॉस्पीटलमध्ये एक धक्कादायक घटना उघड झालीय. एका अवघ्या १३ वर्षांच्या मुलीनं एका बाळाला जन्म दिलाय.

मोबाइल करतोय घोळ, मुली पळून जातात- खासदार राजपाल

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:18

मोबाइल आज खरी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाइल दोन मिनिटे जरी हातात नसला की आपण लगेचच अस्वस्थ होतो.

`मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेतः बसप

Last Updated: Monday, October 22, 2012, 15:38

मुलींना मोबाइल वापरू देऊ नयेत, असं वक्तव्य करून बहुजन समाजवादी पार्टीचे खासदार राजपाल सैनी यांनी रविवारी वादाला तोंड फोडलं आहे.

१३ अल्पवयीन मुली देऊन मिटवला वाद!

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 17:36

पाकिस्तानमध्ये दोन कबिल्यांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी १३ अल्पवयीम मुलींची अदालाबदली करण्यात आली. विशेष म्हणजे या परिषदेला पाकिस्तान संसदेचे सदस्य उपस्थित होते. या प्रकरणाबाबत पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सुमोटो कारवाई करत अशा प्रकार निष्पाप मुलींचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत

Last Updated: Friday, October 5, 2012, 14:55

मुंबईमध्ये सगळ्यात मोठा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण मुंबईत सिम्प्लेक्स बिल्डिंगवर आज ८.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये १५० बांग्लादेशी मुली आणि २०० ग्राहकांना पकडण्यात आलं आहे.

तीन महिन्याच्या मुलीचा घेतला आई-वडिलांनीच जीव

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 20:57

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली आहे. आपल्या ३ महिन्याच्याच मुलीला मारहाण केली, आणि त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

मुलीवर अत्याचार, MMS क्लीप बाजारात प्रसारित

Last Updated: Saturday, September 15, 2012, 12:32

मुलींवर होणारे अत्याचार आणि त्याला बळी पडणाऱ्या मुली यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललली आहे. अशीच घटना नवी दिल्लीमध्येही घडली आहे.

...चला मुलींना आता नवराही विकत घेता येणार

Last Updated: Thursday, September 13, 2012, 14:16

आपला लाईफ पार्टनर शोधण्यासाठी सध्या सर्रासपणे वेबसाईटचा वापर केला जातो. पण आता मात्र तुम्हांला तुमचा नवरा चक्क विकत घेता येणार आहे.

पुण्यात मुलीच्या हत्येचं गूढ

Last Updated: Monday, September 10, 2012, 22:11

१६ वर्षांच्या शाळकरी मुलीची पुण्यात हत्या झालीय. पूजा जाधव असं या मुलीच नाव आहे. ही हत्या का आणि कशी झाली याचा खुलासा नं झाल्यानं ही घटना एक गूढ बनलीय.

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Last Updated: Friday, August 24, 2012, 15:48

नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडलीय. खासगी क्लासमधून परतत असताना या मुलीला तीन नराधमांनी कारमध्ये कोंबून चालत्या कारमध्ये बलात्कार केला.

पाकमध्ये हिंदू मुलीचे धर्मांतर

Last Updated: Saturday, August 11, 2012, 14:45

पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकाशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीचे अपहरण

Last Updated: Thursday, August 9, 2012, 17:46

इस्लातमाबाद- पाकिस्ताकनात एका अल्प वयीन हिंदू मुलीचे अपहरण केल्याढच्यार घटनेने खळबळ उडाली आहे. सिंध प्रांतात ही घटना घडली असून स्थाअनिक अल्पतसंख्यां क समुदायामध्ये चिंता वाढली आहे.