चिनी पुन्हा घुसले, हिंदीत धमकावले! Chinese attack

चिनी पुन्हा घुसले, हिंदीत धमकावले!

चिनी पुन्हा घुसले, हिंदीत धमकावले!
www.24taas.com, झी मीडिया, लेह

ड्रॅगननं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. लेह लडाखमध्ये दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा घुसखोरी केलीय.

गेल्या तीन महिन्यांतली चिनी सैनिकांकडून ही दुसरी घुसखोरीची घटना आहे. झी मीडिया आणि डीएनएला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 जूनच्या दरम्यान भारतीय सीमेत घुसखोरी केलीय. इतकंच नाहीतर चीनी सैनिकांनी स्थानिकांन धमकावलंही.

तसंच चुमूरमध्ये लागलेले हाय रेसुल्यूशन कॅमेरेही चीनी सैनिकांनी तोडले. हे चिनी सैनिक उत्तम हिंदी बोलत असल्याचीही माहिती मिळतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 23:55


comments powered by Disqus