Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:26
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्लीपाकिस्तानसोबतच आता भारतीय सैन्यासमोर चीनचं आव्हान आहे. भारत आणि चीनदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतानाच चीन मात्र छुप्या रीतीनं भारतात शिरण्याची कोणतीही संधी सोडत नाहीय. चीनच्या सैन्यानं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती अरुणाचल प्रदेशमध्येही केल्याचं आता उघड झालंय.
चीनचं सैन्य अरुणाचलच्या चंगलगम भगात वीस किलोमीटरपर्यंत आत आले आणि त्यांनी दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस तिथं मुक्कामही केल्याची माहिती समोर आली आहे. १३ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीची एक तुकडी अरुणाचलच्या सीमेपासून २० किलोमीटर आतपर्यंत आली होती. आणि त्यांनी दोन दिवसांपेक्षा जास्ता तिथं मुक्कामही केला. भारतीय जवानांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चिनी सैनिकांना रोखलं. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या भागातून जाण्यासाठी एकमेकांना फलक दाखविण्यात आले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी चिनी सैनिक निघून गेले.
हा परिसर लष्कराच्या दुसऱ्या डिव्हिजनच्या अखत्यारीत येतो आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या संरक्षणासाठी इंडो-तिबेटीयन पोलिसांचीही मदत होते. याआधी एप्रिलमध्ये चीनचं सैन्य लडाखच्या डेपसांग परिसरात घुसलं होतं. हे ठिकाण सीमेपासून १९ किलोमीटर अंतरावर असून, या ठिकाणी तीन आठवड्यांपर्यंत हे सैन्य ठाण मांडून होतं. भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांत चीनच्या बाजूनं 150पेक्षा अधिक वेळा घुसखोरी करण्यात आली आहे.
भारतीय लष्करानं या विभागातील गस्त वाढवली आहे असून नुकतंच ‘सी-130 जे सुपर हर्क्युअलस` हे बलाढ्य मालवाहू विमान पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक दौलत बेग ओल्डी इथं उतरवलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 09:26