Last Updated: Monday, December 24, 2012, 09:47
www.24taas.com,नवी दिल्लीदेशभरात थंडीची लाट निर्माण झालीये. उत्तरेतल्या राज्यांमध्ये थंडीचा कहर सुरु आहे. जम्मू काश्मिरमध्ये पारा शुन्याचा खाली गेलाय.
श्रीनगरमध्ये तापमान उणे एक अंश नोंदवलं गेलयं. तर पंजाब हरिणाया दिल्ली आणि उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेशात पारा खाली आलाय. सकाळी सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे.
नवी दिल्ली विमानतळावरही व्हिजिबिलीटी कमी झालीये. याचा विमान उड्डाणांवर परिणाम झालाय. शिवाय रेल्वे वाहतुकीवर धुक्याचा परिणाम झालाय.
दिल्लीत रात्रीचं तापमान आठ अंश सेल्सियस नोंदवलं गेलयं. लखनौमध्ये थंडीमुळं शाळांना पाच जानेवारीपर्यंत सुट्टी देण्यात आलीये.
First Published: Monday, December 24, 2012, 09:42