मोदी जिंकले... कमाल खाननं सोडला देश

Last Updated: Saturday, May 17, 2014, 19:55

16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...

...हे आहेत देशातले 543 नवनिर्वाचित खासदार!

Last Updated: Saturday, May 17, 2014, 20:13

देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे. पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...

देशात स्थिर सरकार आशेने शेअर बाजारात उत्साह

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 11:08

सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर देशात स्थिर सरकार येईल या आशेनं शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. सलग तिस-या दिवशी सेन्सेक्स वधारल्याचं दिसतंय.

श्रीलंकेने करून दाखवल, भारताला प्रवेश नाही

Last Updated: Thursday, May 1, 2014, 19:24

`श्रीलंकन एअरलाइन्स` आता `वन वर्ल्ड` या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रातील संघटनेत सामील झाली आहे.

देशाला मोदींसारख्या हुकुमशहाची गरज - परेश रावल

Last Updated: Monday, April 28, 2014, 18:41

देशाला नरेंद्र मोदींसारख्या हुकुमशहाचीच गरज आहे, असे मत अभिनेता आणि भाजपचे अहमदाबादमधील उमेदवार परेश रावल यांनी व्यक्त केलंय.

महिलेनं गाडी चालवण्याचा `गुन्हा` केला म्हणून...

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 16:54

महिलांसाठी वेगळे आणि पुरुषांसाठी वेगळे कायदे असलेल्या आखाती देशांतील कायदे महिलांना मात्र जाचक ठरतात, असं बऱ्याचदा दिसून येतं. असाच एक प्रकार आता पुन्हा सौदीत पाहायला मिळालाय.

बॉम्बस्फोट होणाऱ्या देशांत भारत तिसरा

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:14

जगात होणाऱ्या बॉम्बस्फोटांपैकी ७५ टक्के बॉम्बस्फोट हे पाकिस्तान, इराक त्यानंतर भारतात झाल्याचे समोर आले आहे. सरकारी अहवालानुसार अफगाणिस्तान आणि सीरिया यांच्यापेक्षाही सर्वात जास्त बॉम्बस्फोट भारतात होतात हे स्पष्ट झाले आहे.

देशातील लहान सीईओ, आयफोनचे अॅप्स केले तयार

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 00:08

आश्चर्यकारक एक बातमी....श्रवण आणि संजय कुमारन या चिमुरड्यांनी भारतातले सगळ्यात लहान सीईओ होण्याचा मान पटकावलाय. त्यांची कंपनी आहे गो डायमेन्शन.... झी 24 तासबरोबर एक पाऊल पुढे राहताना अशाच सक्सेस स्टोरी तुम्ही पाहणार आहात आणि राहणार आहात एक पाऊल पुढे.....

परदेशी पाहुण्यांचं देशभरात आगमन...

Last Updated: Saturday, December 28, 2013, 16:05

डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.

सारंगखेड घोडे बाजारात पावणे दोन कोटींची उलाढाल

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 19:26

पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुस-या क्रमाकाचा घोडा...बाजार म्हणून सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो.. यंदा या घोडेबाजारात जवळपास पावणेदोन कोटींची उलाढाल झालीय.. वाद्या आणि घुंगराच्या तालावर नाचणारा हा घोडा आहे धुळ्याच्या सारंगखेडा घोडेबाजारातला..

गूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...

Last Updated: Monday, December 23, 2013, 17:01

आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.

नरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?

Last Updated: Thursday, December 19, 2013, 19:26

सध्या देशात भाजपचे नरेंद्र मोदींची हवा आहे. मोदी सध्या सभा, मेळावे घेण्यावर भर देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपने आतापासून व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केले आहे. सभांनंतर आता मोदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात येणार आहे. मंदिरांचे शहर असणाऱ्या वाराणसी मधून ‘विजय शंखनाद रॅली’ काढण्यात येणार आहे. मात्र, वाराणसीमधील विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून मोदींना रोखण्याची अधिक शक्यता आहे.

‘केबीसी’च्या ऑनलाईन खेळाला भरभरून प्रतिसाद

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 18:19

मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.

पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 17:07

पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दहा देशातील गणपतीचे दर्शन मुंबईत

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:38

लोढा फाउंडेशनच्या वतीनं एक गणेश महोत्सव भरवण्यात आला आहे. भरवण्यात आलेल्या मुंबई गणेश महोत्सवात दहा देशांतील गणरायांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन याठिकाणी गणेशभक्तांसाठी पालीचे मंदिर, हिमालयाची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी उभारण्यात आल्या आहेत.

`फ्री रोमिंग`साठी मोबाईल कंपन्यांची चढाओढ!

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 12:33

सरकारनं मोबाईल कॉल्स ‘रोमिंग फ्री’करण्याच्या अगोदरच टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसतेय. तसे संकेतही मार्केटमध्ये दिसून आलेत.

...तर हातभट्टीच्या दारूविक्रीवर बंदी नको - आठवले

Last Updated: Monday, January 28, 2013, 18:39

दारूबंदी होणार नसेल, तर हातभट्टीच्या दारूविक्रीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

देशात थंडीची लाट, दिल्ली गोठली

Last Updated: Monday, January 7, 2013, 12:28

देशात थंडीची लाट आलीय. तापमानात कमालीची घट झाल्याने दिल्ली, काश्मीर खोरे गोठून गेले आहे. दिल्लीत आज पहाटे अवघे १ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्र गारठला

Last Updated: Sunday, January 6, 2013, 08:48

राज्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. मुंबईचा पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने चांगलाच गारठा जाणवत आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे.

देशभरात थंडीची लाट

Last Updated: Monday, December 24, 2012, 09:47

देशभरात थंडीची लाट निर्माण झालीये. उत्तरेतल्या राज्यांमध्ये थंडीचा कहर सुरु आहे. जम्मू काश्मिरमध्ये पारा शुन्याचा खाली गेलाय.

भारत तर अडाण्यांचा देश - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

Last Updated: Thursday, November 29, 2012, 14:30

भारत म्हणजे बुद्धीमत्तेचा देश असं मानलं जातं, अनेक विद्वान आणि पंडित यांनी आपल्या ज्ञानाची चमक दाखवून भारताचं नाव जगभरात उंचावलं.