Last Updated: Tuesday, December 17, 2013, 11:56
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिलीय. आज हे विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.
या विधेयकाला भाजपाचा कडवा विरोध आहे. या विधेयकामुळे देशाच्या जातीय सलोख्याला धोका उत्पन्न होणार असून यास आम्ही संसदेत विरोध करु असं भाजपनं स्पष्ट केलंय. तृणमूल काँग्रेसनंही त्याविरोधात भूमिका घेतलीय. त्यामुळे आज संसदेत या विधेयकावरुन रणकंदन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संसद परिसरात एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घातला... जोरदार घोषणाबाजी करत या व्यक्तीने जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला विरोध केला.. या व्यक्तीला सुरक्षरक्षकांनी अटक केलीय... आज संसदेत जातीय हिंसाचार प्रतिबंधक
विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 17, 2013, 11:56