तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:46

राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.

का होतोय जातीय हिंसाचार विधेयकाला विरोध, पाहुयात...

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 12:07

वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिलीय. आता हे विधेयक संसदेत सादर होणार आहे... पण, हे विधेयक का वादग्रस्त ठरतंय? जातीय हिंसाचार विधेयकातल्या तरतुदी काय आहेत? पाहुयात...

जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयक आज संसदेत?

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 11:56

वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिलीय. आज हे विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.

`तुलसी`नं रचला इतिहास; गीतेवर हाथ ठेवून पदाची शपथ

Last Updated: Friday, January 4, 2013, 17:33

अमेरिका काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू महिलेनं भगवदगीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतलीय. भारतीय वंशाच्या तुलसी गॅबार्ड यांनी हा इतिहास रचलाय.

इंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 12:55

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.

`एफडीआय`च्या मुद्यावर सरकार पास होणार?

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 09:38

रिटेल ‘एफडीआय’च्या विषयावर आज सरकारची परीक्षा आहे. पण इतर देशांत याच रिटेल एफडीआयची परिस्थिती काय आहे. रिटेल एफडीआयमुळे त्या देशांचा विकास झालाय की उलटा परिणाम झालाय… याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट...

संसदेत बाळासाहेबांना श्रद्धांजली

Last Updated: Thursday, November 22, 2012, 13:46

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहाने श्रद्धांजली वाहिण्यात आली. आजपासून हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.

संसदेत उमटले आसाम हिंसाचाराचे पडसाद

Last Updated: Friday, August 17, 2012, 16:44

ईशान्येकडील भारतीय नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्याचे आज संसदेतही प़डसाद उमटले. स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं ठोस कारवाई करण्याची मागणी सुषमा स्वराज यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये शिकत असलेल्या विद्यर्थ्यांना सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी तसंच त्यांच्यासाठी ठिकाठिकाणी हेल्पलाईनही सुरू करावी अशी मागणी स्वराज यांनी केली.

लोकसभेचे कामकाज स्थगित

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 23:42

संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, काही मिनिटातच ते स्थगित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आसाममधील हिंसाचाराचे पडसाद उमटले.

संसदेत प्रतिभाताई पाटील यांचा सन्मान

Last Updated: Monday, July 23, 2012, 23:19

महाराष्ट्रातील खान्देश कन्या आणि राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांना सोमवारी संसद सदस्यांनी सन्मानाने निरोप दिला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रतिभा पाटील यांना संसदेतर्फे सन्मानित करण्यात आले.

तिहारमधून ए.राजा संसदेत

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 15:51

टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात अडकलेल्या माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांनी संसदेत हजेरी लावली. गेली १५ महिने राजा तिहारच्या जेलमध्ये होते.मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

आयपीएल मॅचफिक्सिंगवरून संसदेत हंगामा

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 16:31

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. भाजपा आणि समाजवादी पार्टीनं या आरोपाच्या सखोल चौकशीची मागणी केली.

बाबासाहेबांचे कार्टुनः दोषींवर कारवाई होणार

Last Updated: Friday, May 11, 2012, 17:12

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टुनचा समावेश असलेल्या सगळ्या पुस्तकांचं वितरण त्वरित थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. तसंच या प्रकरणात दोषी असलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्याचंही आश्वासन सरकारने दिले आहे.

आंबेडकरांच्या कार्टूनवरून संसदेत हंगामा

Last Updated: Friday, May 11, 2012, 15:17

सीबीएसईच्या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टून हटवण्यात येणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिले आहे. सीबीएसईच्या 11 वीच्या पुस्तकात आंबेडकरांच्या कार्टुनवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला.

बाबा रामदेवांच वक्तव्य योग्यच- अण्णा

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 14:57

भारताच्या संसदेत खुनी मंत्री बसले आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेवांनी केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

संसदेत दूध भसळीचा मुद्दा

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 15:18

देशात सुरु असलेल्या दूधातील भेसळीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आलाय. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार रामकृपाल यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करुन सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

सिंघवींच्या 'त्या' सीडीचं संसदेत काय होणार?

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 11:00

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या 'त्या' सीडी प्रकरणाचे पडसाद आज संसदेत उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांना आयती संधी मिळू नये यासाठी सिंघवी यांनी आधीच संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा आणि काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

अफगाणिस्तान संसदेवर रॉकेटहल्ला...

Last Updated: Sunday, April 15, 2012, 17:29

अफगाणिस्तान साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. काबुलमध्ये १२ बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे. ब्रिटीश दूतावासाच्या जवळ स्फोट झाले आहेत.

'लोकपाल' बिल आज तरी पास होणार का?

Last Updated: Thursday, December 22, 2011, 04:35

गेले अनेक दिवस चर्चेचा ठरलेला लोकपाल बिल आज संसदेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात या लोकपाल बिलाविषयी कमालीची उत्सुकता आहे. मागील काही दिवसांपासून सरकार आणि टीम अण्णा यांच्यामध्ये लोकपालच्या मसुद्यावरून मतभेद सुरू आहेत.

अण्णा 'बॅक टू होम'

Last Updated: Monday, December 19, 2011, 07:07

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजचा दिल्ली दौरा रद्द केला आहे. आता ते चेन्नईहून दुपारी पुणेमार्गे राळेगणला जाणार आहेत. अण्णांचा तीन ते चार दिवस राळेगणध्येच राहणार आहेत. अण्णांचे स्वीय सहाय्यक सुरेश पठारे यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसभा मंगळवारपर्यंत तहकूब

Last Updated: Friday, December 2, 2011, 07:03

एफडीआयच्या मुद्यावर सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकेवर ठाम असल्य़ानं संसदेतील कोंडी आजही कायम आहे. दरम्यान सात डिसेंबरपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.

'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ

Last Updated: Monday, November 28, 2011, 06:00

संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.