`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव Congress on backfoot

`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव

`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव
www.24taas.com, नवी दिल्ली

सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आता बॅकफूटवर आलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असं चुकून म्हटलं असेल, अशी सारवासारव काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादासंदर्भात केलेल्या विधानानंतर सरकारनं शिंदेंची पाठराखण केली होती. त्याचबरोबर शिंदेंचं विधान योग्यच असल्याचं विधान कालच संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी केलं होतं. वाचाळतेबद्दल प्रसिद्ध असलेल्या दिग्विजय सिंग आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनीही शुंदेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. पण आज अचानक काँग्रेसच्या नेत्यांना शिंदे चुकून बोलले असतील, असा काँग्रेसला साक्षात्कार झाला आहे.

तर, दुसरीकडे सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आक्रमक झाला आहे. शिंदेंनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलीय. संघाचे मनमोहन वैद्य यांनी ही मागणी केली आहे.

First Published: Tuesday, January 22, 2013, 20:02


comments powered by Disqus