माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर अण्णा हजारे नाराज

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर अण्णा हजारे नाराज

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर अण्णा हजारे नाराज
ww.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे नाराज झालेत. रविवारी हरियाणातल्या रेवारीमध्ये झालेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात सिंह नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर बसल्यानं अण्णा नाराज झालेत. त्यामुळं त्यांच्याशी संबंध तोडल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्यावर पुन्हा संशयाची सुई रोखण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू काश्मीर सरकार उलथवून टाकण्याचा घाट सिंग यांनी लष्करप्रमुख पदावर असताना घातला होता. त्यासाठी त्यांनी एका गुप्त स्पेशल युनिटची स्थापना केली होती.

सीबीआयने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी एका विशेष तपासणी पथकाने केलीय असं इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीत म्हटलं आहे. यामागे कोणत्या राजकीय पक्षाचा हात आहे का याचाही तपास व्हावा, अशी मागणी काँग्रेसने केलीय तर नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर जनरल सिंग आल्यामुळेच सरकार त्यांना अडचणीत आणत आहे, असं प्रत्युत्तर भाजपनं दिलं आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, September 21, 2013, 08:25


comments powered by Disqus