Last Updated: Saturday, November 10, 2012, 19:02
www.24taas.com, नवी दिल्लीज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सक्रिय झाले आहेत. येत्या ३० नोव्हेंबरपासून ते जनजागृतीसाठी देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. त्याआधी त्यांच्या आंदोलनाचे कार्यालय हे दिल्लीत सुरु केले जाणार असून, त्याचे उदघाटन रविवार ११ नोव्हेंबरला होणार आहे.
आज झालेल्या बैठकीसाठी मेधा पाटकर, किरण बेदी यांच्यासह तेरा ते पंधरा लोक उपस्थित होते. या बैठकीत नव्या टीमची घोषणा करण्यात आली, आणि पुढील आंदोलनाची दिशा आणि कार्यक्रम काय असेल यावर चर्चा झाली.
नव्या टीमच्या सदस्यांमध्ये विश्वंभर चौधरी, अविनाश धर्माधिकारी, अक्षयकुमार (ओडीशा), माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, समाजसेविका मेधा पाटकर, कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे, अखिल गोगाई, अरविंद गौड, रणसिंह आर्य, शिवेंद्र सिंग चौहाण, निवृत्त डीजीपी शशिकांत यांच्यासह १३ जणांची टीम आहे.
First Published: Saturday, November 10, 2012, 18:58