अतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद, CRPF patrolling party at Pulwama attacked, two jawans killed

अतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद

अतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद
www.24taas.com, वृत्तसंस्था, श्रीनगर

श्रीनगरमध्ये पुन्हा अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला टार्गेट केले. अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात दोन जवान शहीद झाले. गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर हा हल्ला करण्यात आला.

श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील गस्तीपथकावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान शहीद झाले. श्रीनगरपासून ३२ किलोमीटर अंतरावरील अवंतीपुराजवळील पांडव पार्क येथे आज गुरुवारी संध्याकाळी हा दहशतवादी हल्ला झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सीआरपीएफ जवानांचे पथक महामार्ग सुरक्षितपणे खुला करण्यासाठी गस्त घालत होते. दोन्ही जवानांवर जवळून गोळीबार करण्यात आला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, November 7, 2013, 20:47


comments powered by Disqus