मित्रांच्या मदतीने मुलीकडून पित्याची हत्या Daughter kills father with help of two friends

लैंगिक छळाला कंटाळून मुलीकडून पित्याची हत्या

लैंगिक छळाला कंटाळून मुलीकडून पित्याची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली

दिल्लीत कुरविंदर कौर या 26 वर्षाच्या युवतीने आपल्या जन्मदात्याची हत्या केली आहे. या मुलीच्या आईचा मृत्यू तीन वर्षापूर्वी झाला होता.

तेव्हापासून वडिलांकडून सतत लैंगिक शोषण होत होतं. या लैंगिक शोषणाला कंटाळून आपण वडिलांची हत्या केल्याची कबुली या युवतीने दिली आहे.

विशेष म्हणजे आपल्या 56 वर्षीय पित्याती हत्या करण्यासाठी या युवतीने आपल्या दोन मित्रांची मदतही घेतली आहे.

क्रिकेट स्टॅम्प आपल्या वडिलांच्या डोक्यात टाकल्यानंतर, वडिलांच्या शरीराचे धारदार काचेने तुकडे केले. यानंतर इनोव्हा कारने हे तुकडे जवळच्या नाल्यात फेकले.

पोलिसांच्या तपासानंतर युवतीने हत्येची कबुली दिली आहे. युवतीच्या घरातही रक्ताचे डाग दिसून आले आहेत.

युवतीच्या आईच्या निधनानंतर ती आपल्या वडिलांसोबत राहत होती. तिच्या दोन बहिणींचं लग्न झालं आहे. वडिल आपल्याला खूप त्रास देत होते, असं कारण या युवतीने सांगितलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 13:50


comments powered by Disqus