Last Updated: Thursday, May 9, 2013, 17:28
www.24taas.com, झी मीडिया, चंडिगढयमुनानगर येथे कोल्डड्रिंक प्यायल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक पिणाऱ्याची प्रकृतीही बिघडली आहे.
दोघांच्याही घशात आणि पोटात जळल्याच्या खुणा आहेत. अशा खुणा ऍसिडमुळे होतात. त्यामुळे कोल्ड ड्रिंक ऍसिडमिश्रीत होतं का याचा शोध पोलीस घेत आहेत. तर काही जणांच्या मते कोल्ड ड्रिंकमध्ये दारू मिसळली गेली असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
एका टेलरकडे काम करणाऱ्या विनोद कुमार या २६ वर्षीय युवकाने आपला सहकारी कपिल याच्यासह एक कोल्ड ड्रिंक प्यायलं. यानंतर दोघांनाही उलट्या सुरू झाल्या.तब्बेत बिघडल्याचं पाहून त्यांच्या मालकाने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. तेथेच विनोदचा मृत्यू झाला. पोस्ट मॉर्टममध्ये खुलासा झाला की, कोल्ड ड्रिंकमुळे विनोदचा मृत्यू झाला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 9, 2013, 17:22