दिल्ली गँगरेप : सहा्वा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात, Delhi rape victim taken off ventilator, 6th accused arrested

दिल्ली गँगरेप : सहावा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

दिल्ली गँगरेप : सहावा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
www.24taas.com, औरंगाबाद

नवी दिल्लीमध्ये काल रात्री पॅरा मेडिकलच्या विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातला सहावा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. उत्तरप्रदेशातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील त्याच्या घरात पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केलीय.

दिल्ली गँगरेप प्रकरणातला सहावा आरोपी अक्षय ठाकूर याला दिल्ली पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसाच्या संयुक्त टीमनं टंडवा ठाण्याच्या हद्दीतली लाहनकरमा गावातून अटक केलीय, अशी माहिती प्रभारी पोलीस अधिक्षक प्रणव कुमार यांनी दिलीय. ठाकूर याच्या घरावर पोलिसांची नजर होती. त्याच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवलं होतं. त्यानंतर शुक्रवारी रात्री त्याला त्याच्या घरातूनच अटक करण्यात आली.

एका साध्या शेतकऱ्याचा (सरयू सिंह) मुलगा असलेल्या अक्षय ठाकूरनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीय. आरोपीबद्दल गुप्त सूचना मिळाल्यानंतर लगेचच लक्ष ठेवून असणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. टंडवाच्या सरकारी शाळेतून दहावी पास झालेल्या अक्षयनं छत्तीसगडमध्ये काम करण्यासाठी गाव सोडलं होतं. मागच्याच वर्षी तो दिल्लीत दाखल झाला होता. ट्रंजिट रिमांडसाठी आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे, त्यानंतर त्याला दिल्लीला आणलं जाईल. अक्षयचा छोटा भाऊ अभय सिंह आणि वडील सरयू सिंह यांच्याही चौकशी पोलिसांनी केली आणि त्यांना सोडून दिलं.

दरम्यान, सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षांच्या पीडित मुलीला व्हेंटिलेटरवरून हटवण्यात आलंय.

First Published: Friday, December 21, 2012, 22:20


comments powered by Disqus