केजरीवाल म्हणजे राखी सावंत - दिग्विजय सिंग Diggi raja compares kejriwal with Rakhi Sawant

केजरीवाल म्हणजे राखी सावंत - दिग्विजय सिंग

केजरीवाल म्हणजे राखी सावंत - दिग्विजय सिंग
www.24taas.com, नवी दिल्ली

आपल्या वाचाळतेमुळे प्रसिद्ध असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी `इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. यापूर्वी एकदा केजरीवालांना हिटलर म्हटल्यानंतर आता दिग्विजय सिंगांनी केजरीवालांना राखी सावंत असं संबोधलं आहे.

यावेळी दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर अगदी खालच्या पातळीवरील ट्विट केलं आहे. आपल्याला कोलंबिया युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थ्याने आपल्याला हा एसएमएस पाठवला आहे असं म्हणत दिग्गीराजांनी ट्विट केलंय “अरविंद केजरीवाल आणि राखी सावंत एक सारखेच आहेत. दोघेही सतत एक्पोज करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. पण दोघांकडेही ‘दाखवायला’ काहीच नाही.”

या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल आणि राखी सावंत या दोघांचाही अपमान केला असला, तरी यानंतर दिग्विदजय सिंगांनी फक्त राखी सावंतची माफी मागूत पुन्हा एकदा केजरीवालांवर निशाणा साधला. दिग्विजय सिंग म्हणाले, “ केजरीवालांची तुलना राखी सावंतशी केल्याबद्दल मी राखी सावंतची माफी मागतो. मी राखीचा खूप जूना फॅन आहे.”

First Published: Sunday, November 11, 2012, 21:09


comments powered by Disqus