नरेंद्र मोदींचं `त्या` महिलेशी नातं काय?- दिग्गीराजांचा सवाल Diggiraja asks Modi about his relationship with Yashoda

नरेंद्र मोदींचं `त्या` महिलेशी नातं काय?- दिग्गीराजा

नरेंद्र मोदींचं `त्या` महिलेशी नातं काय?- दिग्गीराजा
www.24taas.com, नवी दिल्ली

मोदींनी शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्करबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी मोदींवर टीका केली आहे. तसंत, यशोदाबेन नामक महिलेशी मोदींचं काय नातं आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. नरेंद्र मोदी भाषणात नेहमी अपशब्द वापरतात. सुनंदा पष्कर यांच्याबद्दल बोलतानाही त्यांनी भान न ठेवता वक्तव्य केलंय. मोदींचं वक्तव्य म्हणजे समस्त महिलावर्गाचा अपमान आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विवाहित आहेत काय, असा खळबजनक सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केलाय. तसंच ‘यशोदा’ नावाच्या एका महिलेशी मोदींचे काय संबंध आहेत, ते त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणीही त्यांनी केलीय. मोदींचं यशोदा या महिलेशी १९६८ सालीच लग्न झालं होतं, असा दावाही दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

मंडी येथे मोदींनी भाषण करताना सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख ‘थरूर यांची ५० कोटी रुपयांची गर्लफ्रेंड’ असा केला होता. या वक्तव्याबद्दल अनेकजणांनी मोदींवर टीका केली. थरूर यांनी माझी पत्नी ५० कोटींहूनही जास्त मौल्यवान असल्याचं म्हटलं होतं, तर सुनंदा पुष्कर यांनी महिलांचा अपमान करणाऱ्या माणसाला निवडून देऊ नका असा प्रचार सुरू केला आहे. मोदींनी आय़ुष्यात कधी कुणावर प्रेम केलंय का असा उलट सवाल शशी थरूर यांनी केला होता. यावर कडी करत दिग्गीराजांनी मोदींचे यशोदा नामक महिलेशी त्याचं नाव जोडलं आहे. यावर मोदी काय प्रतिक्रिया देणार, याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

First Published: Thursday, November 1, 2012, 14:33


comments powered by Disqus