सुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाही

Last Updated: Monday, March 24, 2014, 08:42

केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कुठलीही प्रगती झालेली नाही. व्हिसेरा अहवालात त्यांनी औषधाचं अतिसेवन केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या अहवालातील नोंदी या गुन्हा नोंदवण्यासाठी पुरेशा नसल्याचं म्हटलं आहे.

`नाक दाबून सुनंदा पुष्कर यांच्या तोंडात विष ओतलं`

Last Updated: Monday, February 24, 2014, 12:55

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुनंदा यांचा मृत्यू ही `हत्या` होती असं म्हटलंय.

सुनंदाच्या दोन्ही हातांवर चावण्याच्या खूणा, फॉरेन्सिकचा रिपोर्ट

Last Updated: Thursday, January 23, 2014, 11:56

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीय. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असलेली माहिती म्हणजे सुनंदाच्या दोन्ही हातांवर अनेक जखमा असून चावा घेतल्याचीही खूण आहे.

`शशी थरुर माझ्या आईचा जीव घेऊ शकत नाहीत`

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 09:58

सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिव मेनन यानं दिलेल्या माहितीत, `आपली आई (सुनंदा पुष्कर) खूप धैर्यशील महिला होती. ती कधीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकत नाही` असं म्हटलंय.

सुनंदा पुष्करांच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती...

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 23:10

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्करच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती होती. आयपीएल २०१० मध्ये कोची टस्कर संघासाठी ७० कोटीची भागिदारी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सोडावी लागली होती. त्यावेळी शशी थरूरांनी ७० कोटी जमवल्याचा आरोप झाला होता.

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू संशयास्पद

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 18:44

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा थरूर यांचा मृत्यू, विषबाधेमुळे झाला असल्याचं एसडीएम रिपोर्टमध्ये म्हटलंय. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या या दिशेने तपास करणे गरजेचे असल्याचं जिल्हा सत्र न्यायाधीश अलोक शर्मा यांनी म्हटलं आहे.

पत्नी सुनंदाच्या मृत्यूबाबत शशी थरूर यांनी नोंदवला जबाब

Last Updated: Monday, January 20, 2014, 08:04

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी गूढ कायमच आहे. याप्रकरणी सुनंदा यांचे पती आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. संध्याकाळच्या सुमारास थरुर एसडीएम ऑफिसमध्ये पोहचले. यावेळी एसडीएमनं सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी थरुर यांचा जबाब नोंदवून घेतला.

मृत्यूचं गूढ: मृत्यूपूर्वी सुनंदा आणि शशी थरूरमध्ये झालं होतं भांडण

Last Updated: Sunday, January 19, 2014, 12:42

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. नवनवे खुलासे समोर येतायेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा धक्कादायक खुलासा डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टमनंतर केलेला असतानाच, या प्रकरणाचा गुंता आणखी वाढवणारी आणि भुवया उंचावणारी माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वीच, थरूर आणि सुनंदा यांच्यात १५ जानेवारीला विमानातच जोरदार भांडण झाल्याचं समोर आलंय.

मृत्यूपूर्वी काय सांगितलं सुनंदा पुष्कर यांनी नलिनी सिंग यांना?

Last Updated: Sunday, January 19, 2014, 16:58

केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू पूर्वी त्यांनी पत्रकार आणि सुनंदा यांची मैत्रिण असलेल्या नलिनी सिंग यांना फोन केला असल्याचं स्पष्ट झालंय. नलिनी सिंग यांनी याबाबत माहिती दिलीय.

सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू: झी मीडियाचा मोठा खुलासा!

Last Updated: Sunday, January 19, 2014, 10:14

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी झी मीडियानं मोठा खुलासा केलाय. सुनंदा यांच्या मृत्यूनंतर २४ तासांत झी मीडियाच्या कॅमेऱ्यात हॉटेल लीलाची दृष्यं कैद झालीत. याच हॉटेलच्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता..

सुनंदा पुष्कर यांच्यावर अंत्यसंस्कार; थरुर यांच्या अडचणी वाढल्या

Last Updated: Saturday, January 18, 2014, 22:07

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. औषधांचा ओव्हरडोस हे मृत्यचं कारण असू शकतं. अलीकडच्या काळात त्यांचं मद्यपानाचं प्रमाण वाढलं होतं. धुम्रपानाचं प्रमाणही वाढलं होतं असं सूत्रांनी दिलेल्या माहितीत कळतंय. दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत पोस्टमॉर्टेम सुरू राहणार आहे. थरूर यांचा ड्रायव्हर तसंच इतर स्टाफचीही चौकशी होणार आहे.

सुनंदा मृत्यू : पंचतारांकित हॉटेलमधून CBIने मोबाईल घेतला ताब्यात

Last Updated: Saturday, January 18, 2014, 12:45

सुनंदा पुष्कर यांचा गुढ मृत्यू हायप्रोफाईल केस असल्यामुळे CBIच्या फॉरेन्सिक टीम ने लीला हॉटेलमधील सुनंदा राहत असलेल्या खोलीची पाहाणी करून पुरावे गोळा केलेत. सुनंदा यांच्या मोबाईल CBIने ताब्यात घेतला आहे. दरम्यान, पती केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल कण्यात आलं होतं.

सुनंदा यांचे अखेरच ट्विट, हसत जाणार!

Last Updated: Saturday, January 18, 2014, 09:51

केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचे दिल्लीतील लीला या पंचतारांकीत हॉटेलमध्ये गुढ मृत्यू झाला. मात्र, त्याआधी सुनंदा यांनी अखेरच ट्विट केला होता, मी हसत जाणार. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत अधिकच गुढ वाढलंय.

सुनंदा पुष्कर यांच्या मृ्त्यूनं `ट्विटर` विश्व हादरलं!

Last Updated: Saturday, January 18, 2014, 12:22

सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसलाय. यामध्ये अनेक राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पाहुयात कुणी कुणी काय म्हटलंय...

‘ओह माय गॉड’… मेहर तरार यांची प्रतिक्रिया!

Last Updated: Friday, January 17, 2014, 23:04

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पण, त्यांच्या मृत्यूनं मात्र सगळ्यांनाच धक्का बसलाय. असाच धक्का सुनंदा पुष्कर यांच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनाही बसलाय. मेहर तरार यांनी ‘ओह माय गॉड’ असं ट्विट केलंय.

कोण होत्या सुनंदा पुष्कर?

Last Updated: Friday, January 17, 2014, 23:41

आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे गेले दोन दिवस चर्चेत असणाऱ्या सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह हाती सापडला आहे. दिल्लीतील लीला हॉटेलमधल्या रुम नं. ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह सापडला. केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या त्या पत्नी होत्या.

शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू

Last Updated: Friday, January 17, 2014, 23:47

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

`ट्विटर वॉर`नंतर... सुनंदा आणि शशी थरूर `आनंदी दाम्पत्य`!

Last Updated: Thursday, January 16, 2014, 18:29

ट्विटरवॉर रंगल्यानंतर मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशि थरूर यांनी आपल्या पत्नीसोबत एक खुलासा आता जाहीर केलाय. या खुलाशामध्ये, दोघांनीही `आम्ही नव्हे त्यातले...`ची भूमिका घेतलीय.

आयएसआय एजंट सोबत शशी थरूर यांचं अफेअर- सुनंदा पुष्कर

Last Updated: Thursday, January 16, 2014, 11:52

नेहमीच विविध वादांमध्ये अडकणारे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. मात्र यावेळी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनीच शशी थरूर यांच्यावर त्यांचं पाकिस्तानी पत्रकारसोबत अफेअर असल्याचा आरोप केलाय.

केंद्रीय मत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

Last Updated: Thursday, January 16, 2014, 11:27

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. हॅक केल्यानंतर या अकाऊंटवरन एका पाकिस्तानी पत्रकारानं काही रोमॅन्टिक मॅसेज सुद्धा पाठवले आहेत.

नरेंद्र मोदींचं `त्या` महिलेशी नातं काय?- दिग्गीराजा

Last Updated: Thursday, November 1, 2012, 14:56

मोदींनी शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्करबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी मोदींवर टीका केली आहे. तसंत, यशोदाबेन नामक महिलेशी मोदींचं काय नातं आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. न

सुनंदा पुष्कर यांनी दिली काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानाखाली

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 21:04

केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेल्या शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर आणि वाद हे ठरलेले असतात. थरुर हे स्वतःच्या ट्विटरवरील कमेंटमुळे नाही तर सुनंदा पुष्कर यांनी केलेल्या कारनाम्यामुळे थरूर चर्चेत आहेत.

मोदी म्हणाले, "वाह क्या गर्लफ्रेंड है!"

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 08:45

हिमाचल प्रदेशात प्रचारार्थ झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शशी थरूर यांचं नाव न घेता त्यांच्या पत्नीवर बोचरी टीका केली. नरेंद्र मोदींनी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख ‘५० कोटींची गर्लफ्रेंड’ असा केला. निवडणूक सभेत मोदींनी जमावाला विचारलं, “वाह! क्या गर्लफ्रेंड है...कभी आपने देखी है ५० करोड की गर्लफ्रेंड?”