Last Updated: Saturday, July 13, 2013, 18:56
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हिंदू राष्ट्रवादी’ वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी देशाला धर्माच्या नावावर विभागत असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
मोदी यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर म्हटलं, “आपल्याला हिंदू राष्ट्रवादी, मुस्लिम राष्ट्रवादी, शीख राष्ट्रवादी किंवा ख्रिस्ती राष्ट्रवादी होण्यापेक्षा राष्ट्रवादी भारतीय व्हायला नको का?” दुसऱ्या ट्विटमध्ये दिग्गीराजांनी सावरकरांवर निशाणा साधत लिहिलं आहे, “या महान राष्ट्राला सावरकर आणि जिन्नांप्रमाणे धर्माच्या आधारावर विभागू नका. ते दोघे द्विराष्ट्र सिद्धांताचे जनक होते.”
यावेळी मोदींच्या कट्टरतेची निंदा करताना दिग्विजय सिंग यांनी पाकिस्तानातील मलालाचं कौतुक केलं आहे. १६ वर्षीय मलाला ही जागतिक साक्षरतेचं प्रतिक बनली आहे. तिने कट्टरता आणि तालिबान यांच्यावर टीका केली आहे.याबद्दल दिग्गिराजांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, July 13, 2013, 18:56