Last Updated: Monday, December 30, 2013, 12:03
www.24taas.com, झी मीडिया, सोनिपत पोलीस स्टेशनमध्ये डिस्को... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. पोलीस स्टेशनमध्ये डीस्कोचा प्रकार घडलाय हरियाणामध्ये…
सोनीपतच्या एका इन्स्पेक्टरने त्याला मिळालेल्या प्रमोशनच्या आनंदात ‘डिस्कोडान्स’चं आयोजन केलं…. तेही आपल्याच पोलीस स्टेशनमध्ये... हा ‘डिस्कोडान्स’ अर्थातच मुलींनी केला हे वेगळं सांगायला नकोच... हा डान्स पाहायला त्याने जवळच्या गावातल्या अनेक ग्रामस्थांनाही त्याने या डिस्कोपार्टीला बोलावलं. सोनीपत पोलीस स्टेशनचा प्रभारी सुल्तान सिंहला डीएसपीचं प्रमोशन मिळालं. त्यामुळे या डिस्कोडान्सचं आयोजन केलं होतं.
मात्र, मीडियाने याबाबत प्रश्न विचारल्यावर या कार्यक्रमाचं आयोजन गावाच्या सरपंचाने केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. पण पोलिसांचा हा दावा खोटा असल्याचंच उघड झालंय.
व्हिडिओ पाहा – पोलीस स्टेशनमध्ये वाजतंय... ‘छत पे सोया था बहनोई...’ •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 30, 2013, 12:03