Last Updated: Tuesday, September 18, 2012, 16:31
www.24taas.com, पुणे माजी टीम अण्णांमध्ये आता दुफळी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द अण्णा हजारेंनीच तशी कबुली दिलीय.
अरविंद केजरीवल यांचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत, आमचं ध्येय मात्र एकच राहील, असं अण्णांनी पुण्यात म्हटलंय. पक्ष आणि पक्षीय राजकारणापासून आपण सुरूवातीपासूनच दूर आहोत असं, असा पुनरुच्चार आज अण्णांनी पुन्हा एकदा केलाय. अरविंद केजरीवालांनी पक्ष काढला तर आपण त्यात सामील होणार नाही, असंही अण्णांनी स्पष्ट केलंय. अण्णांच्या या वक्तव्यानं टीम अण्णांमधली दुफळी आता स्पष्ट झालीय.
अण्णा हजारे अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि पासून फारकत घेत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला अण्णांच्या आजच्या वक्तव्यामुळे पृष्टी मिळालीय. आपण भ्रष्टाचारविरोधी लढा व लोकांत जनजागृती करणे सुरुच ठेवणार असून, देशभर दौरा काढणार असल्याचे अण्णांनी यावेळी जाहीर केलंय. भविष्यातील आंदोलनाबाबत अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही. जाणकारांचा सल्ला घेऊनच आंदोलनाची दिशा ठरवू, असे त्यांनी सांगितले.
First Published: Tuesday, September 18, 2012, 16:31