Last Updated: Saturday, December 7, 2013, 11:20
www.24taas.com, झी मीडिया, गोवाडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी 2 वाजता गोव्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात केलीय..
डॉ. दाभोलकर यांच्या मारेक-यांशी या दोघांचं वर्णन जुळत असल्याने ही कारवाई करण्यात आलीय.. या दोघांपैकी एक जण मुंबईचा आहे.. मारेक-यांचे स्केच या दोघांशी मिळतंजुळतं आहे.. दाभोलकर हत्या प्रकरणाला शंभर दिवस उलटल्यानंतर तपासाला वेग आलाय.
गेल्या काही महिन्यांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात अज्ञात व्यक्तीनी गोळी झाडून हत्या केली होती. मॉर्निंग वॉकला जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 7, 2013, 09:55