Last Updated: Tuesday, January 28, 2014, 20:52
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा गुन्हा कबुल करावा, यासाठी आपल्याला २५ लाखांची ऑफर दिलेली आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला या प्रकरणी पोलिसांकडून गोवण्यात येत आहे, असा दावा करणारे मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार केला आहे. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळेच आपण असे वक्तव्य केले होते. मात्र कोणाकडून कुठलीच ऑफर आपल्याला मिळालेली नाही. पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून आपण केवळ रागातून असे वक्तव्य केल्याचं आरोपींनी कबुल केलयं .