Last Updated: Saturday, August 3, 2013, 11:49
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली जम्मू काश्मीर पुन्हा हादरलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेत. काल रात्री ३ च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसलेत.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी सांगण्यात येतेय. या भूकंपामुळे अनेक ठिकाणी घराच्या भिंतींना तडे गेल्याचंही बोललं जातंय. गेल्या १९ तासांत २ भूकंपामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. इथल्या नागरिकांनी रात्र भितीच्या सावटाखाली घालवलीय.
दरम्यान, काल उत्तर भारतात अनेक ठिकांणी भूकंपाचे हादरे बसले. चंदिगढ आणि हिमाचलमध्ये १५ सेकंद भूकंप झाला.
जम्मूमधील काही भागांत भूकंप झाला. सकाळी ८.०२ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. या भूकंपाने कोठेही नुकसान झालेले नाही. भूकंपाची तीव्रता ५.४ रिस्टर स्केल होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 3, 2013, 11:49