एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर, नऊ जण ठार, Eight killed as two Air Force choppers collide in Gujarat

एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर, नऊ जण ठार

एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर, नऊ जण ठार
www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातच्या जामनगर भागात आज एअरफोर्सच्या सरावादरम्यान भयंकर अशी दुर्घटना घडलीय. एअरफोर्सच्या दोन हेलिकॉप्टर्समध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण ठार झालेत तर दोन जण जखमी झालेत.

एअरफोर्सच्या ‘एमआय-१७’ या हेलिकॉप्टरर्सनं सरावादरम्यान एकमेकांना धडक दिली. जामनगर एअरफोर्स बेसवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात हा अपघात झाला. जामनगरपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘सम्राट’ या गावाजवळ हा अपघात झाला आणि दोन्ही हेलिकॉप्टर्सचा चक्काचूर झाला. ही दुर्घटना ज्या स्थानिकांनी पाहिली त्यांचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ‘आकाशात झेप घेतल्यानंतर काही काळातच ही दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांना धडकले. जमिनीवर कोसळत असतानाच यातल्या एका हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि या हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळेच जण आगीच्या भक्ष्यस्थ पडले.’

या अपघातात नऊ जण मृत्यूमुखी पडल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. जामनगरच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. अपघातानंतर भारतीय हवाईदलाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, फायर ब्रिगेडचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.

First Published: Thursday, August 30, 2012, 14:27


comments powered by Disqus