माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात आठ ठार, Eight killed in the Maoist mine explosion

माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात आठ ठार

माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात आठ ठार
www.24taas.com, झी मीडिया, रांची

झारखंडमधल्या दुमकामध्ये संदिग्ध माओवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात सहा निवडणूक कर्मचारी आणि दोन पोलीस शहीद झालेत.

दुमका मतदारसंघातल्या निवडणुकीचं काम करुन हे सर्वजण परत असताना माओवाद्यांनी स्फोट करुन त्यांचे वाहन उडवून दिले, अशी माहिती झारखंडचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी दिलीय.

झारखंडमधल्या दुमका, राजमहल, गोड्डा आणि धनबाद मतदारसंघात गुरुवारी मतदान झालं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 25, 2014, 10:56


comments powered by Disqus