Last Updated: Thursday, November 24, 2011, 16:52
माओवादी नेते कोटेश्वर राव उर्फ किशनजी हे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. ही चकमक पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापोर जिल्ह्यातील झगराम भागातील खुशबनी इथे झाली. या महिन्याच्या सुरवातीला माओवादी आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये शस्त्रसंधीची बोलणी फिस्कटली होती हे लक्षात घेण्याजोगं आहे. किशनजी यांचा मृतदेह एके ४७ रायफल सोबत जंगलात सापडल्याच्या वृत्ताला सुरक्षा दलांनी दुजोरा दिला आहे.