मंदिरातील फूल आणि माळांनी तयार होणार वीज!, Electricity will create by Devotees item

मंदिरातील फूल आणि माळांनी तयार होणार वीज!

मंदिरातील फूल आणि माळांनी तयार होणार वीज!
www.24taas.com, झी मीडिया, फैजाबाद
अयोध्या मंदिरात लाखो श्रद्धाळू फूल आणि बेलपत्र वाहून आपली आस्था व्यक्त करतात. भक्तांच्या श्रद्धेची ही भेट वस्तू बनतो पण दुसऱ्या दिवशी ही सामुग्री मंदिराच्या गल्ली बाहेर डंप करण्यात येते.

श्रद्धेची ही फूल ज्या ठिकाणी चिरडली जातात त्या ठिकाणी रस्त्यावर कुचून आजारांना आमंत्रण देतात. पण देवाला अर्पण केलेले हे फूल आणि माळा मठ- मंदिर आणि घरात वीज निर्माण करतील किंवा स्वयंपाकाचा गॅस तयार केला तर?
या विजेचा वापर केवळ घराला उजळून टाकण्यासाठी नाही तर कमर्शिल वापर केल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकते.

अयोध्येत लवकर असे होणार आहे. यासाठी बायोगॅस बेस्ड डिसेंट्रलाइज्ड पावर जेनरेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन प्रॉजेक्टच्या माध्यम वापरण्यात येऊ शकते.

कशी तयार होणार वीज
बायोगॅस एनर्जी प्लांटचे अधिकारी आणि जिल्हा विकास अधिकारी अभिराम त्रिवेदी यांनी सांगितले, की प्लांटसाठी १० हजार स्केअर फूटाची जमीन हवी आहे. या जमिनीवर बायो एनर्जी मिशन सेलची टेक्निकल टीम साचा लावणार आहे. या कुंडात आठवड्यात एकावेळेस ७५० किलो मंदिरातून आलेल्या टाकाऊ वस्तू, शेण आणि इतर बायोडीग्रेडेबल वेस्टला अंबविण्यामुळे हेवी मिथेन वायू तयार होईल. याचा वापर स्वयंपाकाचा गॅस आणि जनरेटरच्या माध्यमातून विजेच्या रुपात केला जाऊ शकतो.

२०० ते ८०० घरात पोहणार वीज
बायोगॅस बेस्ड एनर्जी प्लांटवर १५ केव्हीए पासून ४५ केव्हीएपर्यंत जनरेटर ऑपरेट होऊ शकतो. १५ केव्हीएचा जनरेटर रोज १० तास २०० घरात वीज पुरवठा करू शकतो. म्हणजे एखादे छोटे गाव उजळू शकतो. प्लांटच्या माध्यमातून कनेक्शन देऊन मोठ्या प्रमाणात कमाई होऊ शकतो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 21:18


comments powered by Disqus