खूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!, EPFO to give 8.75% interest on PF deposits for F

खूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!

खूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या ५ कोटीं पेक्षा ही जास्त भागधारकांसाठी २०१३-२०१४मध्ये ८.७५ टक्के व्याज देणार आहे. ईपीएफओच्यावतीनं व्याज दरावरील घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी सांगितलं की, ईपीएफओनं २०१३–१४मध्ये पीएफ जमा करण्यासाठी ८.७५ टक्के व्याज देण्याचा निर्णय केला आहे.

पीएफवरील मिळणाऱ्या व्याजदरामध्ये वाढकरुन ८.५० टक्क्यांहून ८.७५ टक्क्यांपर्यंत केलंय. ईपीएफओ संबंधी निर्णय घेणारे विश्वस्त सेंट्रल बोर्ड (सीबीटी) यांच्या बैठकीत याबाबतीत निर्णय घेण्यात आला आहे.

चालू वर्षातील ईपीएफओचं उत्पन्न २०,७९६.९६ कोटी रुपये एवढं असण्याचा अंदाज आहे. ईपीएफओनं २०१२ – १३मध्ये ८.५ टक्के इतके व्याज दिलं होतं. तसंच २०११–२०१२मध्ये व्याजदर ८.२५ टक्के होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 13, 2014, 13:59


comments powered by Disqus