गुडन्यूज... तुमचा पीएफ एटीएममध्ये मिळणार

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 12:29

बॅंक खात्यातील पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसेच आता तुमच्या पीएफ खात्यातील पैसेही एटीएममधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी प्रशासन कामाला लागले आहे. ही गुडन्यूज केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनीच दिलेय.

गूड न्यूज: १५ ऑक्टोबरपासून मिळणार कायमचं पीएफ खातं

Last Updated: Monday, April 21, 2014, 17:50

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.

पीएफ धारकांना खूशखबर..मिळणार जास्त व्याज

Last Updated: Thursday, February 20, 2014, 15:29

पीएफ धारकांना चांगला परतावा मिळणार आहे. कारण पीएफवर ८.७५ टक्के व्याज देण्याचा विचार सुरू आहे. हा निर्णय चालू वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएफ धारकांना भविष्य निर्वाह निधीचे चांगले पैसे मिळणार आहेत.

खूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!

Last Updated: Monday, January 13, 2014, 13:59

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या ५ कोटीं पेक्षा ही जास्त भागधारकांसाठी २०१३-२०१४मध्ये ८.७५ टक्के व्याज देणार आहे. ईपीएफओच्यावतीनं व्याज दरावरील घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी सांगितलं की, ईपीएफओनं २०१३–१४मध्ये पीएफ जमा करण्यासाठी ८.७५ टक्के व्याज देण्याचा निर्णय केला आहे.

अतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद

Last Updated: Thursday, November 7, 2013, 20:47

श्रीनगरमध्ये पुन्हा अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला टार्गेट केले. अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात दोन जवान शहीद झाले. गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर हा हल्ला करण्यात आला.

पीएफवर ८.५ टक्के व्याज?

Last Updated: Monday, September 9, 2013, 12:08

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) ८.५ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हा व्याजदर २०१३-१४ या वर्षासाठी असेल. याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर व्याजदराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

`पीएफ` खातं होणार ऑनलाईन हस्तांतरीत

Last Updated: Monday, August 19, 2013, 08:57

भविष्यनिर्वाह निधीचं म्हणजेच पीएफ खात्याचं ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणाऱ्या सुमारे 13 लाख ‘पीएफ` खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळं अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओनं ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.

मुगाबेंच्या विजयी दाव्यानंतर झिम्बाब्वेत तणाव

Last Updated: Friday, August 2, 2013, 08:19

झिम्बाब्वेत बुधवारी झालेल्या मतदानानंतर अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या झानु-पीएफ या पक्षाने विजयाचा दावा करत तशी घोषणाच केली. या घोषणेनंतर हरारे येथील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. पक्षांची कार्यालये आणि अन्य ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१५ ऑगस्टपासून पीएफ करा `ऑनलाईन ट्रान्सफर`

Last Updated: Monday, July 29, 2013, 12:38

कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) १५ ऑगस्टपासून पीएफ खात्याचं ऑनलाईन ट्रान्सफर सुविधा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या सेवेचा जवळजवळ १३ लाख चाकरमान्यांचा फायदा होणार आहे.

पीएफ आता एका क्लिकवर, `ई-पासबुक` सेवा

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:35

केंद्रीय भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) खात्यामध्ये जमा असलेली रक्कम आता ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे पीएफ आता एका क्लिकवर दिसू शकेल. आपला हवा असलेला तपशील डाऊनलोडही करून ठेवता येईल.

`पीएफ` काढा, ट्रान्सफर करा केवळ तीन दिवसांत!

Last Updated: Thursday, June 20, 2013, 11:34

पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीचे दावे तीन दिवसांत निकालात काढण्यात यावेत, असा प्रस्ताव सादर करण्यात आलाय.

खुशखबर... महागाई भत्ता अन् पीएफ व्याजदर वाढला!

Last Updated: Thursday, May 16, 2013, 11:54

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जून २०१३ पासून आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

पीएफ आता ऑनलाईन ट्रान्सफर

Last Updated: Sunday, April 21, 2013, 15:13

तुम्ही नोकरी बदलली किंवा नोकरी सोडली तर केंद्रीय भविष्य निधीची (पीएफ) काळजी करू नको. आता पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा काढणे सुलभ झाले आहे.

प्रॉव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याज!

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 07:42

एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफवर 2012-13 च्या आर्थिक वर्षांसाठी साडे आठ टक्के व्याज दिले जाण्याची शक्यता आहे.

सर्वांचा पगार होणार कमी, कटींग जास्त

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 13:19

आगामी काळात नोकरदारांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधी, म्हणजे पीएफचं कटिंग वाढण्य़ाचे संकेत पीएफ कार्यालयाच्या एका सूचनेमुळे मिळतायत.

आता ‘पीएफ’चा हिशोब ठेवायची गरज नाही!

Last Updated: Saturday, December 1, 2012, 09:11

नोकरदार वर्गासाठी एक खूशखबर आहे… आता शासकीय सेवेतल्या आणि खाजगी सेवेतल्या नोकरदारांना पीएफचा हिशोब ठेवायची गरजच उरणार नाहीए. कारण...

जवानांनी १८ नक्षलवाद्यांना केलं ठार

Last Updated: Friday, June 29, 2012, 13:14

छत्तीसगडमधील दंतेवाडा जंगलात सुरु असलेल्या नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर ५ नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यावेळी सीआरपीएफचे ६ जवानही जखमी झाले आहेत.

पीएफवर ८.६ टक्के व्याजदर

Last Updated: Friday, April 27, 2012, 15:52

नोकरी करणाऱ्यांसाठी एख खुश खबर आहे. पीएफवर ८.६ टक्के व्याजदर मिळणार आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात ईपीएफवर तब्बल ९.५ टक्के इतका व्याजदर दिला गेला होता. २०११-१२ मध्ये मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तो थेट ८.२५ टक्क्यांवर आणला होता. त्यावर कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.

नक्षल हल्ला : २२ संशयितांची चौकशी सुरु

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:47

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षलवाद्यांनी CRPF जवानांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झालेत. तसंच २८ जवान जखमी झालेत. या घटनेनंतर 22 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

छोट्या गुंतवणूकदारांना खुशखबर!

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:30

कोट्यवधी छोट्या गुंतवणूकदारासाठी एक खूशखबर! सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आणि मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) या सारख्या पोस्टातील योजनांवरील व्याजदर ०.५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अमंलबजावणी १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

नक्षलवादी हल्ल्यात १२ जवान शहीद

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 18:20

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे १५ जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आज सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्फोट, २ ठार

Last Updated: Sunday, December 25, 2011, 18:33

नांदेडपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय क्रमांक -३ मध्ये रविवारी झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर ६ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

प्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 03:14

काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.