Last Updated: Saturday, September 15, 2012, 08:59
www.24taas.com, रायपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सुदर्शन यांचे आज हृदयविकाराच्या छटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला . सुदर्शन यांचे 81व्या वर्षी निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते माजी सरसंघचालक होते. 2000 ते 2009 मध्ये सरसंघचालक म्हणून त्यांनी संघाचे काम पाहिले होते.
छत्तीसगडमधील रायपूर येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. के.सुदर्शन यांचे पार्थिव आज संध्याकाळी नागपूर येथे आणण्यात येणार आहे.
उद्या, रविवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 2000 ते 2009 या कालावधीत के.सुदर्शन हे आरएसएसचे सरसंघचालक होते.
First Published: Saturday, September 15, 2012, 08:49