शेअर बाजाराच्या घडामोडींवर नजर - रघुराम राजन, Eye on developments in the stock market - Rajan

शेअर बाजाराच्या घडामोडींवर नजर - रघुराम राजन

शेअर बाजाराच्या घडामोडींवर नजर - रघुराम राजन
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

शेअर बाजारातल्या मोठ्या चढ-उतारांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असल्याचं बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केलंय. काल त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारातल्या घडामोडींबाबत सावध केलंय.

या पार्श्वभूमीवर राजन यांनी ही माहिती दिली. तसंच शेअर बाजार नियंत्रक सेबीही घडामोडींवर नजर ठेवून आहे.
गेल्या तीन सत्रांमध्ये मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं तब्बल सतराशे अंशांची उसळी घेतलीये. कालच्या व्यवहारांत सेन्सेक्सनं 24 हजारांना गवसणी घातली. दिवसअखेर त्यात थोडी घट होऊन मुंबई शेअर बाजार 23 हजार 871 अंशांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 94 अंशांच्या वाढीसह 7 हजार 109 अंशांवर बंद झाला... अवघ्या दोन दिवसांत एक हजाराचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम मुंबई शेअर बाजारानं केलाय. देशातली मोदी-लाट आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर देशात स्थीर सरकार येईल, अशी आशा शेअर बाजाराला वाटतेय. याचाच परिणाम गुंतवणूकदार आणि गुंतवणूक संस्थांच्या मानसिकतेवर झालाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 08:04


comments powered by Disqus