Last Updated: Monday, October 22, 2012, 15:37
www.24taas.com, नवी दिल्लीबंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. फसीह मोहंम्मद असं या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे. सौदी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला दिल्लीत आणण्यात आलं.
दिल्ली पोलिसांनी त्याला विमानतळावर अटक केली. फसीहच्या अटकेमुळं महत्वाची माहिती पोलिसांना मिळू शकते.
First Published: Monday, October 22, 2012, 12:38