दीडशे रुपयांसाठी बापानं दुसऱ्या मुलीलाही विकलंFather sold his 1 year girl for only 150 rs.

दीडशे रुपयांसाठी बापानं दुसऱ्या मुलीलाही विकलं

दीडशे रुपयांसाठी बापानं दुसऱ्या मुलीलाही विकलं
www.24taas.com, वृत्तसंस्था, भोपाळ

एकीला विकून पोट भरलं नाही तर दारुड्या बापानं केवळ दीडशे रुपयांसाठी आपल्या पोटच्या एक वर्षाच्या मुलीला विकल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय. मध्य प्रदेशच्यादिट्या जिल्ह्यात हा प्रकार घडला. यापूर्वीही या नराधमानं त्याच्या अन्य एका मुलीला विकलं होतं.

त्यानं मुलीला ज्या महिलेला विकलं ती वेश्या व्यवसायाशी संबंधित असल्याचं समजतं. लेकीला विकणार्‍या मोहन केवट याला पत्नी पुष्पानं दिलेल्या तक्रारीच्या आधारं शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

तक्रारीनुसार 20 एप्रिल रोजी पुष्पा कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यावेळी चार वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाची राधिका घरी होते. सायंकाळी जेव्हा पुष्पा घरी आली तेव्हा राधिका बेपत्ता होती. तिनं मोहनला विचारलं तेव्हा त्यानं कानावर हात ठेवले. शोध घेऊनही राधिका न सापडल्यानं अखेर संशय आल्यानं तिनं परिसरातील काही लोकांना याची माहिती दिली.

शेजार्‍यांनी मोहनकडे विचारणा केली, तेव्हा 150 रुपयांसाठी एका महिलेला राधिकाला विकल्याचं कबूल केलं. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. राधिकाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 12:12


comments powered by Disqus