Last Updated: Wednesday, March 13, 2013, 13:01
www.24taas.com, श्रीनगरश्रीनगरमध्ये दहशदवाद्यांनी हल्ला केला आहे. बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफच्या जवानांना यश आलं आहे. पब्लिक स्कूलच्या मोकळ्या मैदानात विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणत्याही विद्यार्थ्याला मात्र इजा झाली नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी या भागातील एका शाळेमध्ये आसरा घेतला. त्याचवेळेस काही विद्यार्थी मैदानावर खेळत होते. त्यानंतर मात्र सीआरपीएफच्या जवानांनी शाळेला घेराव घातला. त्यात झालेल्या गोळीबारात पाच सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. तर सात जवान जखमी झाले आहेत.
अजूनही शाळेत काही अतिरेकी लपले आहेत का? याचा जवान शोध घेत आहेत. शाळेच्या परिसरातून दोन दहशतवाद्यांचे शव ताब्यात घेण्यात आले आहे. अजूनही पुन्हा एकदा गोळीबार सुरू असल्याचे नुकताच हाती आलेल्या वृत्तावरून समजते आहे.
First Published: Wednesday, March 13, 2013, 12:14