रॉक बँण्ड : तरूणींना धमकी तक्रार दाखल, FIR against online abusers of J&K all-girl band

रॉक बँण्ड : तरूणींना धमकी तक्रार दाखल

रॉक बँण्ड : तरूणींना धमकी तक्रार दाखल
www.24taas.com, जम्मू

काश्मिरातल्या मुलींच्या रॉक बॅण्डला धमकी देणाऱ्यां विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. श्रीनगरच्या राजबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉक बॅण्डच्या मुलींना सोशल नेटवर्क साईटवरुन धमकी देण्यात आली होती, त्यामुळं या बॅण्डमधील एका मुलीनं बॅण्डला अलविदा केला आहे. मुलींच्या रॉक बॅण्डला धमकी प्रकरण श्रीनगरच्या राजबाग पोलिसांत गुन्हा दाखल आयटी एक्टनुसार तक्रार दाखल करून घेतली आहे.

काश्मिरमध्ये एकमात्र असणाऱ्या मुलीच्या `प्रगाश`बँण्डला इस्लामी संघटनेने गैरइस्लामी म्हंटले आहे आणि त्याविरोधात फतवा काढला होता. त्यामुळे त्या बँण्डमधील एका मुलीने बँण्डला अलविदा केला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लासह अनेक लोकांनी त्यांना समर्थन केले आहे. आणि त्यांनी त्या मुलीला गाणं न सोडण्याचा आग्रह केला आहे.

या तरूणींनी पुरूषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात पाऊल ठेवल्याने परंपरावादी समाजाने त्यांच्यावर बंधने आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना सोशल नेटवर्किंग साईटवरून धमकीही देण्यात आली आहे. सर्वोच्च मुल्ला बशिरूद्दीन अहमद यांनी या गाण्याला गैर इस्लामिक म्हंटले आहे. आणि त्याविरोधात फतवाही जारी केला.

First Published: Tuesday, February 5, 2013, 14:01


comments powered by Disqus