सुरतमध्ये कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग fire in commercial building in surat

सुरतमध्ये कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग

सुरतमध्ये कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग
www.24taas.com, झी मीडिया, सुरत

सुरतमध्ये एका कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग लागलीय. या आगीमुळे ऑर्किंड बिल्डिंगचं फार मोठं नुकसान झालं आहे.

फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या आग विझवण्याचं काम करत होत्या. या सतरा मजली इमारतीत सकाळी 10 वाजता आग लागली होती.

या बिल्डिंगमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे कार्यालय आहेत. यात मोठा कपड्यांचा बाजारही आहे.

आग लागल्यानंतर तात्काळ सर्व लोक सुरक्षित बाहेर आले असल्याचं सांगण्यात येत आहे.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 16:55


comments powered by Disqus