सुरतमध्ये कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग

Last Updated: Thursday, May 29, 2014, 19:08

सुरतमध्ये एका कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग लागलीय. या आगीमुळे ऑर्किंड बिल्डिंगचं फार मोठं नुकसान झालं आहे

चिपळूण बाजारपेठेत कपडा दुकानांना भीषण आग

Last Updated: Friday, May 9, 2014, 14:13

चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

तळोजाच्या एमआयडीसीमध्ये पेट्रो-केमिकल कंपनीला भीषण आग

Last Updated: Monday, December 2, 2013, 19:01

नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसीमधील तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मुंबईतल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग

Last Updated: Thursday, November 21, 2013, 13:05

मुंबईतल्या बॅक बे आगाराच्या मागे असलेल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक

Last Updated: Thursday, October 17, 2013, 16:11

मुंबईतल्या माझगाव इथं वाडीबंदर परिसरातील एका गोदामाला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक झालंय. या आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही.

मंत्रालयाची भीषण आग नियंत्रणात

Last Updated: Saturday, March 9, 2013, 17:54

मंत्रालयाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बांठिया यांनी दिली. या आगीची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही देण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

मंत्रालयाला पुन्हा एकदा भीषण आग

Last Updated: Saturday, March 9, 2013, 17:55

मंत्रालयाला पुन्हा एकदा भीषण आग लागली. ही आग चौथ्या मजल्याला लागली आहे. याआधी चौथ्या मजल्यावर २१ जून २०१२ रोजी मंत्र्यालयाला २.४० मिनिटांनी लागही आग होती.

आज ‘ईस्टर्न एक्सप्रेस हाय-वे’नं प्रवास टाळा...

Last Updated: Monday, March 4, 2013, 08:17

गॅस टँकर उलटल्यानं झालेल्या अपघातमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळं ज्या प्रवाशांना ईस्टर्न हायवेनं प्रवास करायचा आहे त्यांना आज विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

फ्लायओव्हरवरून गॅसनं भरलेला टँकर उलटला; भीषण आग

Last Updated: Monday, March 4, 2013, 07:37

सोमवारी पहाटे फ्लायओव्हरवरून गॅसचा टँकर कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातानंतर टँकरनं पेट घेतल्यानं या अपघातानं रस्त्यावरच आगीचं रुद्र रुप धारण केलंय.

कोलकातामध्ये आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 21:21

कोलकातामध्ये सूर्यसेन मार्केटमधील एका सहा मजली कॉम्प्लेक्साला आज बुधवारी भीषण आग लागल्याने १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामन दलाच्या अठरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

माहीममध्ये भीषण आग, २ मुलांसह सहा जणांचा मृत्यू

Last Updated: Friday, January 25, 2013, 15:21

मुंबईत माहीमच्या नयानगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ लहान मुलांचा समावेश आहे.

धूरकल्लोळ : पेंट फॅक्टरीमध्ये भीषण आग

Last Updated: Thursday, November 8, 2012, 17:14

बंगलोरमधल्या एका प्रसिद्ध पेंट फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीनं उग्र रुप धारण केलंय.

पाकिस्तानमध्ये भीषण आग, १९१ जणांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 16:48

पाकिस्‍तानात दोन कारखान्‍यांना लागलेल्‍या आगीमध्‍ये सुमारे १९१ जणांचा मृत्‍यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

`बीकेसी`तल्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात

Last Updated: Friday, September 7, 2012, 13:27

मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला भागात एका इमारतीला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

ताडदेवमध्ये इमारतीला भीषण आग, २० जण अडकले

Last Updated: Thursday, August 9, 2012, 17:58

मुंबईतील ताडदेव भागात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. बस डेपोसमोरील एव्हरेस्ट टॉवर या इमारतीला भीषण आग लागली आहे.

तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग, ३२ ठार

Last Updated: Monday, July 30, 2012, 13:23

आंध्रप्रदेशमधील नेल्लोरमध्ये तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. त्यामुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू एक्सप्रेसच्या एस-११ डब्याला लागलेल्या आगीत ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

Last Updated: Friday, June 22, 2012, 11:55

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, June 21, 2012, 22:56

मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

मंत्रालयाचा विमाच नाही!

Last Updated: Friday, June 22, 2012, 07:22

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:38

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

मंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, June 21, 2012, 18:40

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

कोल्हापूरमध्ये ऑईल मिलला भीषण आग

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 14:02

कोल्हापूरजवळ गोकुळ शिरगावमध्ये अन्वर ऑईल मिलला भीषण आग लागली. या भीषण आगीत ऑईल मिल जळून खाक झाली. पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली होती.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:34

नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग लागलीय. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीनं प्रयत्न सुरू आहेत.

मिरा रोड १५० झोपड्या आगीत खाक

Last Updated: Monday, March 12, 2012, 22:41

मिरा रोड परिसरात १०० ते १५० झोपड्यांना आग लागली आहे. पोलिसांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. काही दिवसांतच या झोपड्या खाली करण्याचे काम सुरु होणार होते. पण तत्पूर्वीच या झोपड्यांना आग लागली.

कोलकतातील दोघा डॉक्‍टरांना अटक

Last Updated: Friday, January 27, 2012, 14:40

कोलकतातील एएमआरआय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगप्रकरणी रुग्णालयाच्या दोघा डॉक्‍टरांना पोलिसांनी अटक केली. या रुग्णालयात ९ डिसेंबर २०११ रोजी आग लागून ९० जणांचा मृत्यू झाला होता.