रॉकेलनं भरलेल्या मालगाडीला आग; लाखोंचं नुकसान , fire in railway in up

रॉकेलनं भरलेल्या मालगाडीला आग; लाखोंचं नुकसान

रॉकेलनं भरलेल्या मालगाडीला आग; लाखोंचं नुकसान
www.24taas.com, बहराइच, उ.प्रदेश

उत्तरप्रदेशात रॉकेलचे टँकर्स घेऊन जाणाऱ्या मालगाडीला लागलेल्या भीषण आगीत १६ डबे जळून खाक झालेत. पहाटे तीनच्या सुमारास गाडीचं इंजिन आणि चार डबे रुळावरून घसरले. त्यामुळे गाडीनं पेट घेतला.

बहराईच जिल्ह्यातल्या जरवल स्थानकाजवळ ही घटना घडली. यात १६ डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलावे लागले तर चार पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या. जवळजवळ ३२ ट्रेनच्या प्रवाशांना बसलाय. बिहार-वाराणसी मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आले. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी आलोक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊवरून बिहारच्या बेतालपूरला जाणारी व्ही.टी.पीएन टॅँक वॅगन मालगाडीचे १६ डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आणि आगीच्या भक्षस्थानी पडले. या सर्व डबे रॉकेलनं भरले होते.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल आठ तास झगडावं लागलं. या घटनेमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय.

First Published: Friday, December 7, 2012, 16:44


comments powered by Disqus